पुणे : पीएमपीची सुरू असलेली अत्यावश्यक सेवेतील वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली. कारण सीएनजीने पीएमपी प्रशासनास थकीत रक्कम लवकर भरा अन्यथा तुमचा पुरवठा बंद करू अशी नोटीस दिली आहे. संचारबंदीच्या काळात पीएमपीचे अर्थचक्र पूर्णपणे थांबले आहे. त्यातच पिंपरी चिंचवड महापालिकेने पीएमपीचे देखील देणी थकविले असल्या कारणाने पीएमपीवर ही नामुष्की ओढावली आहे.
संचारबंदीमुळे पीएमपीची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी सुरू आहे. यात केवळ ११८ गाड्या दररोज धावत आहे. यातून मिळणारे उत्पन्न देखील कमी आहे. पुणे महापालिका २० कोटी तर पिपरी चिंचवड महापालिका १८ कोटी ह्या अत्यावश्यक सेवेच्या बिलापोटी देणे आहे. यात पुणे महापालिकेने २० कोटींची रक्कम पीएमपीला दिली आहे तर पिपरी चिंचवड कडून अद्याप येणे बाकी आहे. ही रक्कम लवकर नाही मिळाली तर सिएनजी चा पुरवठा तर खंडित होईलच शिवाय मे महिन्यातील पीएमपी च्या कर्मचाऱ्याच्या वेतनावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. ......सीएनजी चे ५२ कोटी थकले...…सीएनजी वर पीएमपीचे बहुतांश गाडया धावतात.पैकी सध्या ११८ गाडया अत्यावश्यक सेवेत धावत आहे. सीएनजी पुरवठा बदल्यात पीएमपी ५२ कोटी रुपये देणे लागते. ती रक्कम थकल्याने सीएनजी ने बुधवारी पीएमपी ला नोटीस बजावली आहे.त्यात थकीत रक्कम भरा अन्यथा इंधन पुरवठा बंद करू असे म्हटले आहे. ...... पीएमपीला सीएनजीची नोटीस मिळाली असून थकीत रक्कम लवकर अदा करावी असे सांगितले आहे.पीएमपी ची आर्थिक स्तिथी सध्या नाजूक आहे. पुणे महापालिकेनी आपली रक्कम दिली असून पिपरी चिंचवड महापालिकेकडून अद्याप येणे बाकी आहे. अशीच स्तिथी राहिली तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. - डॉ.चेतना केरुरे, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे.