पुणे : ‘ओएलएक्स’च्या जाहिरातीवरून राहायला आलेल्या पेइंग गेस्टनेच घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पेइंग गेस्टने घरातील सुमारे ३७ हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डल्ला मारला होता. तो अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असून, कोथरूड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेला मालही जप्त करण्यात आला आहे.गोरखनाथ ऊर्फ अर्जुन दादासाहेब वाघ (वय २०, रा. एरंडवणे, मूळ रा. पैठण, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अमित सिंग (सुवर्णमय सोसायटी, परमहंसनगर, कोथरूड) यांनी ३० सप्टेंबरला फिर्याद दिली आहे. सिंग यांनी केलेल्या तक्रारीनुसार, पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांनी तपास सुरू केला. याबाबत वाघ याकडे चौकशी केली असता त्यानेच चोरी केल्याचे समोर आले. रजपूत यांना मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाघ याला अटक करून एरंडवाणा येथील एका खोलीत ठेवलेला चोरीचा माल जप्त करण्यात आला. (वार्ताहर)
‘पेइंग गेस्ट’ पडला महागात
By admin | Published: October 14, 2015 3:35 AM