PDCC Election: जिल्हा बँक 'अ गट' मतदार संघ; मुळशी, हवेलीत प्रस्थापितांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 11:19 AM2022-01-04T11:19:14+5:302022-01-04T11:19:28+5:30

संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा बँकेच्या अ वर्ग गटात मुळशी आणि हवेली तालुक्यात प्रस्थापितांना जोरदार धक्का देत नवीन व तरुण संचालकांची बँकेच्या राजकारण एन्ट्री झाली

PDCC Election: District Bank 'A Group' Constituency; Mulshi, pushing the established in the mansion | PDCC Election: जिल्हा बँक 'अ गट' मतदार संघ; मुळशी, हवेलीत प्रस्थापितांना धक्का

PDCC Election: जिल्हा बँक 'अ गट' मतदार संघ; मुळशी, हवेलीत प्रस्थापितांना धक्का

googlenewsNext

पुणे : संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा बँकेच्या अ वर्ग गटात मुळशी आणि हवेली तालुक्यात प्रस्थापितांना जोरदार धक्का देत नवीन व तरुण संचालकांची बँकेच्या राजकारण एन्ट्री झाली. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या, तर 7 जागासाठी आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. यामध्ये मुळशी तालुका मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे 28 मते घेत भरघोस मतांनी विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी कलाटे यांना 17 मते मिळाली. 

हवेलीमधून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्केंना पराभवाची धूळ चारत विकास दांगट विजयी झाले आहेत. तब्बल २० वर्ष संचालक असलेल्या म्हस्के यांचा ११ मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादीने ही मैत्रीपूर्ण लढत म्हणून जाहीर केली होती. जो निवडून येईल तो उमेदवार आपला हे सूत्र राष्ट्रवादीने याठिकाणी लागू केले होते.

Web Title: PDCC Election: District Bank 'A Group' Constituency; Mulshi, pushing the established in the mansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.