कान्हुरमेसाई : वनविभागाच्या दुर्लक्षामुळे व पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया प्रा. लिमिटेड या विद्युत कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मोर या राष्ट्रीय पक्ष्याची अपघाती मृत्यूच्या घटना वरूडे (ता. शिरूर) परिसरात वाढल्या आहेत. मृत मोरांचा पंचनामा करण्याआधी कोल्हे, कुत्रे त्यांना ओरबाडून खात असल्याने पुरावाही नष्ट होत आहे. त्यामुळे मोरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे.चिंचोली मोराची, वरूडे, ननवरेवस्ती, भरणे मळा या परिसरात मोरांची संख्या जवळपास २ ते अडीच हजारांच्या आसपास आहे. तसेच परिसरातील पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे मोर आजूबाजूच्या गावात पसरत चालले आहेत. वरूडे, कान्हुरमेसाई, खैरेवाडी परिसरात वरील कंपन्यांची ४०० किलो वॅटची एक लाइन जात असून आळेफाट्याने शिक्रापूर या लाईनचे काम चालू आहे. ८०० किलो वॅट एवढा मोठा विद्युत दाबाने वहन होत असताना संबंधित कंपन्यांनी या पशुपक्ष्यांच्या जिवाला धोका होऊ नये, म्हणून कुठलीही उपाययोजना केली नाही. ही या परिसरातील वस्तुस्थिती आहे. अशाच पद्धतीने औद्योगिकरणासाठी वीजवाहक टॉवर लाईनचे जाळे पसरवण्यास येत्या १० ते १५ वर्षांत मोर हा राष्ट्रीय पक्षी नामशेष होण्याची भीती चिंचोली वरूडेच्या ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.वनविभागाने या कंपनीवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. संबंधित पॉवर ग्रीड कंपनीचे वेंकटेश यांना विचारले असता, टॉवर लाईन व मोरांचा यात कसलाही संबंध नाही. वरूडे येथील पोलीसपाटील भाऊसाहेब शेवाळे यांनाही कल्पना द्या, असे सांगितले.
वरुडेत वीजवाहक तारांमुळे मोरांचा मृत्यू
By admin | Published: April 10, 2016 4:05 AM