(स्टार १०९० डमी)
पुणे : श्रावण महिना सुरू झाला आहे. खिचडी, भगर अशा उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. साबुदाणा आणि शेंगदाण्याचे दर ५ रुपयांनी वाढले आहेत. मागणी वाढल्याने भावही किंचित वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. साबुदाणा ८० ते ९५ रुपये प्रतिकिलो, तर शेंगदाणा १०० ते ११५ रुपये किलो आहे.
मागील काही महिन्यांपासून राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्याचा परिणाम इतर क्षेत्रांप्रमाणे मालवाहतुकीवर देखील झाला आहे. वाहतूकदारांनी खर्चात वाढ केली आहे. त्यामुळे साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. श्रावण महिन्यापूर्वी आणि आताच्या दरातील फरक पाहता शेंगदाणे, साबुदाणा किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे.
----
...असे वाढले दर (प्रतिकिलो)
श्रावणाआधी आता
साबुदाणा ८०-९० ९०-९५
शेंगदाणे १००-११५ १००-१२०
----
* आवक घटली, मागणी वाढली
१) साबुदाण्याचे दर का वाढले?
पुण्याच्या बाजारात औरंगाबाद, सोलापूर, अकोला, लातूर तसेच परराज्यातून आयात होतो. वाहतूक खर्च वाढला आहे. त्याचा मुख्य परिणाम दर वाढण्यात झाला आहे.
२) शेंगदाण्याचे दर का वाढले?
राज्याच्या विविध भागांतून शेंगदाणा पुण्याच्या बाजारात येत असतो. पेट्रोल, डिझेलचे सातत्याने दर वाढत असल्याने दळणवळणाचा खर्चदेखील वाढला आहे. त्यामुळे दरात किंचित वाढ झाल्याचे व्यापारी सांगतात.
-----
* भगरीचे दरही वाढले
भगरीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. सध्या भगर १०० ते ११५ रुपये प्रतिकिलो आहे. आपल्याकडे साबुदाणा तामिळनाडूमधील सिलम जिल्ह्यातून येतो. पुरवठ्यावर परिणाम झाल्याने भगरीच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
----
* मागणी आहे पूर्वीप्रमाणेच
श्रावणात दरवर्षी शेंगदाणा आणि साबुदाणा यांची मागणी वाढत असते. त्याप्रमाणात पुरवठ्यावर काहीसा परिणाम होतोच. यंदा साहजिकच दरावरही याचा किंचितसा परिणाम झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी १०० रुपयांहून अधिक दर वाढले होते. मात्र, आता सध्या खूप नाही, पण दरात चार-पाच रुपयांचा इकडे-तिकडे फरक पडला आहे.
- अशोक लोढा, व्यापारी