पुणे: पुण्यातल्या एसएनडीटी महाविद्यालयासमोरचा पादचारी पुल पाडायला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. महामेट्रोच्या कामात हा पुल अडथळा ठरत होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आता हा पूल सीओईपी हॅास्टेल समोर स्थलांतरीत होईल.
कर्वे रस्त्यावरील वाहतूक वाढली तशी नागरिकांना रस्ता क्रॅास करायला अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन कॅालेज ते कर्वे रस्ता पार करण्यासाठी पादचारी पुल बांधण्यात आला. पुण्यातील पहिल्या काही पादचारी पुलांपैकी हा एक पुल होता. आता या ठिकाणी महामेट्रोचे काम सुरु झाले आहे. तसेच नळस्टॅाप चौकात फ्लायओव्हर देखील बांधण्यात येणार आहे. या कामांना या पुलाची अडचण होत असल्याने आज हा पुल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्थायी समितीने या प्रस्तावाला आज मान्यता दिली. हा पुल आता महामेट्रो कडून काढुन सिओईपी हॅास्टेल समोर स्थलांतरीत करण्यात येणार आहे.