शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

रस्त्यांवरच पादचारीच उपेक्षित

By admin | Published: March 21, 2017 5:38 AM

रस्त्यावर पहिला अधिकार पादचाऱ्यांचा असे म्हटले जाते. परंतु, हा अधिकार केवळ बोलण्यापुरताच मर्यादित राहिला आहे.

पुणे : रस्त्यावर पहिला अधिकार पादचाऱ्यांचा असे म्हटले जाते. परंतु, हा अधिकार केवळ बोलण्यापुरताच मर्यादित राहिला आहे. रस्त्याचा हा पहिला मानकरी रस्ते अपघातात सर्वाधिक बळी ठरणारा घटक आहे. पुण्यातल्या रस्त्यांवर वर्षाला साधारणपणे १२0 पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू होत असल्याचे कटू वास्तव आहे. जागोजाग अतिक्रमणांनी वेढलेले पादचारी मार्ग, पदपथ यामुळे नाईलाजास्तव पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालत जावे लागते. नियोजनबद्ध पदपथ असतील तर कदाचित अनेक निष्पापांचे प्राण वाचू शकतील. शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्यांसह, नेहरू रस्ता, सिंहगड रस्ता, सोलापूर आणि नगर रस्ता, सातारा रस्ता, या रस्त्यांवर पादचारी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या प्रमुख रस्त्यांसह मध्यवर्ती आणि उपनगरांमधील अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आणि बेकायदा पार्किंग होत असल्यामुळे पादचाऱ्यांची अडचण झाली आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवरच्या पदपथावरूनही पादचाऱ्यांना चालत जाण्याची स्थिती सध्या तरी नाही. याकडे महापालिका आणि पोलीस दोघांकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. नित्याचीच झालेली वाहतूककोंडी आणि मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यांवरच्या या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यांवरुन चालावे लागते. वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, पुण्याला दरवर्षी जे अपघाती मृत्यू होतात, त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण पादचाऱ्यांचे असते. त्यासोबतच दुचाकी चालकांच्या मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. पादचारी मार्गांवरुन चालणे कठीण होऊन बसले असून, पदपथांवर आणि लगत लागणारी वाहने, पथारी यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. वयोवृद्ध नागरिक, गरोदर स्त्रिया, अपंग आणि लहान मुलांना जिवाचा धोका पत्करून रस्त्यांवरुन चालत जावे लागते. रस्ता ओलांडण्यासाठी सुयोग्य आखणी केलेले झेब्रा क्रॉसिंगही अनेकदा उपलब्ध नसतात. त्यामुळेही अपघाताचा धोका संभवतो. प्रशासकीय दुर्लक्षाचे बळी ठरत असलेल्या पादचाऱ्यांच्या हक्कांबाबत मात्र नागरिकच उदासीन आहेत. महापालिकेकडूनही अतिक्रमणांवर नाममात्र कारवाई केली जाते. कारवाई नंतर अवघ्या एक-दोन दिवसांतच पुन्हा स्थिती जैसे थे होऊन बसते. पादचारी अनेकदा पथारीवाल्यांशी, अतिक्रमण करणाऱ्यांशी वाद घालतात, मात्र मुजोर दुकानदार, पथारीवाले, पार्किंग करणारे पादचाऱ्यांनाच दमात घेतात. घाईगडबडीत निघालेले दुचाकीचालक तर रस्त्यावर कोंडी झालेली असल्यास थेट वाहने पदपथावरच घालतात. वाहतूक शाखा आणि मनपाने संयुक्त अभियान राबवत पादचाऱ्यांच्या हक्कांसाठी विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे. स्वारगेट चौक, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शनिपार चौक, मंडई आदी भागांमध्ये त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी तर पादचारी सिग्नल्सच नाहीत.