शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

दौंड तालुक्यात लक्षवेधी लढतींवर लागल्या पैजा

By admin | Published: February 17, 2017 4:24 AM

तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काही गटांत आणि गणांत लक्षवेधी निवडणूक होणार आहे. या लढतींकडे सर्वांचे लक्ष

दौंड : तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काही गटांत आणि गणांत लक्षवेधी निवडणूक होणार आहे. या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. दरम्यान या रणधुमाळीत कोणाची वर्णी मतदारराजा लावेल यावर पैजा लागल्या आहेत. जिल्हा परिषद गटातील लिंगाळी-मलठण, राहू-खामगाव, केडगाव-पारगाव, खडकी-पाटस या चार गटांसह काही गणांत लक्षवेधी निवडणूक होईल. या गटामधून कोण बाजी मारतो यावर पैजादेखील लागलेल्या आहेत. विशेषकरून केडगाव-पारगाव गटात पैजा लागलेल्या आहेत. या निवडणुकीत विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु काही गण आणि गट वगळता तालुक्यात राष्ट्रवादी, रासप, भाजपा, आरपीआय युती यांच्यात सरळ दुहेरी लढत होईल, अशी परिस्थिती राहील. शिवसेना, काँग्रेस यांसह काही बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांमुळे काही गटांमध्ये निवडणुकीतील चुरस वाढलेली आहे. परिणामी हे उमेदवार राष्ट्रवादी, रासप,भाजपा, आरपीआय युतीच्या उमेदवारांना काही गटांत आणि गणांत पराभवाचा धक्का देऊ शकतात. लिंगाळी-मलठण या गटातून राष्ट्रवादीचे वीरधवल जगदाळे आणि भाजपाचे केशव काळे यांच्यात दुहेरी लढत होत आहे. वीरधवल जगदाळे यांनी दौंड शुगरच्या माध्यमातून तर केशव काळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या परिसरात ग्रामस्थांशी नाळ जोडलेली आहे. या दोन्ही उमेदवारांना राजकीय वारसा आहे. तसेच मलठण गणात ताराबाई देवकाते या राष्ट्रवादीकडून तर रासपकडून हिराबाई देवकाते आणि शिवसेनेकडून मनीषा सूर्यवंशी यांच्यात तिरंगी लढत आहे. मनीषा सूर्यवंशी यांचे पती शरदचंद्र सूर्यवंशी यांनी मलठण-लिंगाळी गटातून माघार घेतल्यामुळे त्यांची ताकद पूर्णपणे ते आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी वापरतील असे या गणात बोलले जात आहे. राहू-खामगाव गटात पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा तथा महानंदच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे तर रासपकडून पूनम दळवी यांच्यात दुहेरी लढत होत आहे. परंतु ओबीसी आघाडीच्या योगिता कुदळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या गटात निवडणुकीची रंगत वाढलेली आहे. मात्र या तिहेरी लढतीत कोणाला फटका बसतो हे मात्र गुलदस्तात आहे. (वार्ताहर)