पुणे : पुणे स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनकडून विविध सायकल कंपन्यांमार्फत शेअर सायकल याेजना शहरात राबविण्यात येत आहे. या याेजनेला पुणेकरांनी खासकरुन तरुणांनी सुरुवातील चांगला प्रतिसाद दिला. या याेजनेत सायकल कंपन्या वाढत गेल्याने सायकलींचे प्रमाण कमालीचे वाढले. परंतु सध्या या सायकलींची अवस्था काहीशी बिकट झाली असून काही समाजकंटकांकडून या सायकली वाऱ्यावर साेडण्यात येत अाहेत. त्यामुळे या सायकली अाता शहरात कुठेही लावल्या असल्याचे चित्र अाहे.
शहरात स्मार्ट सायकल याेजना माेठ्या थाटामाटत सुरु करण्यात अाली. सुरुवातीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अाणि नंतर शहारातील काही ठराविक भागांमध्ये या याेजनेचा शुभारंभ करण्यात अाला. सुरुवातीला एक रुपयाला अर्धा तास या दराने या सायकली उपलब्ध हाेऊ लागल्या. एका कंपनीने तर थेट काही महिन्यांसाठी माेफत सेवा दिली. या सायकली भाड्याने घेण्याची पद्धत अाॅनलाईन अाहे. त्याचबराेबर शहरात तयार करण्यात अालेल्या सायकल स्टेशन्सवरच या सायकली अाणून साेडणे अपेक्षित अाहे. परंतु काही समाजकंटकांकडून या सायकली कुठेही लावल्या जात अाहेत. त्यातच या सायकलींची माेठ्याप्रमाणावर ताेडफाेड झाल्याची प्रकरणेही समाेर अाली हाेती. सध्या अनेक सायकल कंपन्या ही शेअर सायकल सेवा देत अाहेत. पावसळ्यामुळे या याेजनेला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे.