वासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायती भागामध्ये वाढत्या तापमानाबरोबरच तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध असणारे सर्वच स्रोत आटले आहेत. पाळीव प्राण्यांबरोबरच वन्य प्राण्यांनाही चारा व पाण्याअभावी जीवन जगणे मुश्कील झाले आहे.शासनामार्फत ५० पैशापेक्षा कमी पैैसेवारी असलेल्या गावातील नागरिकांसाठी व जनावरांसाठी पुरेसे पाणी व चारा पोहोचवण्याचे नियोजन करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, अद्यापही या भागामध्ये ठोस दुष्काळी योजना अमलात येताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यासाठी शासनाने तत्काळ नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा व पाणी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)
जनता पाण्याविना, तर जनावरे चारा-पाण्याविना कासावीस
By admin | Published: May 13, 2016 1:07 AM