पुणे : दिवाळी जवळ अाल्याने शहरातील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या अाहेत. कपडे, अाकाशकंदील, पणत्या, फटाके खरेदी करण्यासाठी नागरिक अाता बाजारपेठांमध्ये गर्दी करत अाहेत. शहरातील मध्यवर्ती भागांबराेबरच उपनगरातही संध्याकाळच्या वेळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत अाहे.
सर्वांच्या अायुष्यात अानंद, चैतन्य, उत्साह घेऊन येणारा दिवाळी हा सण. या सणानिमित्त नवीन कपडे असाे किंवा इतर वस्तू यांची खरेदी केली जाते. प्लॅस्टिक अाणि थर्माकाॅलला बंदी असल्याने यंदा बाजारात विविध प्रकराचे कागदाचे तसेच लाकडी अाकाश कंदील दाखल झाले अाहेत. त्याचबराेबर अाकर्षक, विविध अाकारांच्या पणत्या सुद्धा नागरिकांचे लक्ष वेधून घेत अाहेत. कुंभारवाड्यात तयार किल्ला घेण्यासाठी बच्चे कंपनी हजेरी लावत अाहेत. किल्ल्यावर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या चित्रांची सुद्धा खरेदी केली जात अाहे.
रविवारी शहराच्या मध्य भागात खरेदीसाठी नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती. त्यामुळे शिवाजी रस्त्यावर काही काळ वाहतूक काेंडी झाली हाेती. काही नागरिकांनी रस्त्यतातच अापली वाहने लावल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला हाेता. काेर्टाने जरी फटाके उडवण्यावर वेळेचे निर्बंध घातले असले तरी नदीपात्रात उभारण्यात अालेल्या स्टाॅल्सवर फटाके खरेदी करण्यासाठी नागरिकांची खासकरुन तरुणांची पाऊले वळत अाहेत. दरम्यान दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी सुद्धा एसटी स्टॅंण्ड तसेच रेल्वे स्टेशनवर गर्दी हाेत अाहे. दिवाळी निमित्त एसटी प्रशासनाकडून जादा गाड्या देखील साेडण्यात अाल्या अाहेत.