पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन सोहळा पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. दरवर्षी मुंबईत साजरा होणारा वर्धापन दिन सोहळा यंदा १५ वर्षानंतर प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढायचं ते जिंकण्यासाठीच या नव्या नाऱ्याने पक्ष महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. यावेळी भाषणात राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. लोकं आपल्याकडे येतात ही मनसेची १६ वर्षातील कमाई आहे. त्यामुळे तुम्ही घरोघरी लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे असं सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले, मतदारांचे आभार माना, ते तूमच्याकडे येतात कसले संपर्क कार्यालय, कार्यकर्ता एकटा बसलेला असतो यावेळी ते चौकशी करतात. खरतर कार्यालय न उघडता लोकांनी पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला पाहिजे. लोक आपल्याकडे येतात हा आपला विश्वास आहे. ही मनसेची १६ वर्षातील कमाई आहे. माझ्याकडे तुमच्या आभाराला शब्द नाहीत. मनसैनिकांसाठी २ वर्षात अनेक काम केली आहेत. पुढच्या काळात बरेच काही करायचे आहे. पदाधिकाऱ्यांच्या घरी जाणार जेवणार आहे. इतरांसारखे जात बघून मी काही ठरवत नाही.
मोदींना पत्र लिहावेसे वाटते
दोन वर्षे भाषण नाही, मुलाखती झाल्या, कुठे बोललो,भाषण नाही. दोन वर्षांपूर्वी आझाद मैदानात मोर्चा, त्यानंतर नाहीच विचार करत होतो, प्रक्टीस नाही, चूकणार नाहीना कोणी विचार केला नसेल असे दिवस पहावे लागतील. घरे शांत रस्ते शांत स्पर्श करायलाही भीती वाटत होती. सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. असे कधी पाहिले नव्हते. घराबाहेर फक्त पक्ष्यांचे आवाज आणि शांतता होती. मोदींना कळवावेसे वाटते महिन्यातून एकदोन वेळा लॉकडाऊन ठेवा. त्यांना पत्र लिहिण्याची इच्छा झाली होती.