शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

‘त्या’ मुलांच्या भविष्यासाठी एकवटले ग्रामस्थ

By admin | Published: November 15, 2016 3:28 AM

अनावश्यक खर्च टाळून जमलेले तीस हजार रुपये विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या रणगाव येथील कदम दाम्पत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षित ठेवीच्या

इंदापूर : अनावश्यक खर्च टाळून जमलेले तीस हजार रुपये विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या रणगाव येथील कदम दाम्पत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षित ठेवीच्या रूपाने मदत करण्यात आली. रणगाव येथील ब्रह्मदेव मित्र मंडळ, अभिजित तांबिले मित्र परिवार व ग्रामस्थांनी एक आदर्श निर्माण केला.गणेशोत्सवादरम्यान ओढ्यावरची विद्युत मोटर चालू करताना रणगाव येथील गणेश तानाजी पवार यांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी सरसावलेल्या त्यांची पत्नी शुभांगी यांनाही विजेचा धक्का बसला. दोघेही मृत्युमुखी पडले. त्यांचा ३ वर्षांचा मुलगा शुभम व दीड वर्षाची मुलगी पायल हे दोघेही अनाथ झाले. ब्रह्मदेव मित्र मंडळ व ग्रामस्थांनी या चिमुकल्यांना मदतीचा निर्णय घेतला. दिवाळीसारख्या खर्चिक सणात अनावश्यक खर्च टाळून रक्कम एकत्रित केली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अभिजित तांबिले यांना त्याची कल्पना दिली. त्यांनीही मित्र परिवाराच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. तीस हजार रुपये जमा झाले. ते कदम यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षित ठेवीच्या रूपात बँकेत ठेवले. कदम यांच्या घरी जाऊन तांबिले यांच्या हस्ते पावती त्यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्द केली. जयदादा फडतरे, सचिन गोसावी, लहुचंद्र रणमोडे, राहुल रणमोडे, राजेंद्र हगवणे, संजय रणमोडे, शशिकांत रकटे, संदीप मचाले, अनिकेत रणमोडे, किशोर हगवणे, प्रदीप पवार, वैभव कदम, दिलीप सावंत, व्यंकटेश पवार, प्रमोद रकटे, सचिन रकटे उपस्थित होते. (वार्ताहर)