मंगेश पांडे ल्ल पिंपरी
अपघातानंतर एका तासाच्या आत उपचार मिळाल्यास जखमीचा जीव वाचू शकतो, यालाच ‘गोल्डन अवर’ म्हणतात. मात्र, द्रुतगती महामार्गावरील जखमीला रूग्णालयात पोहोचविण्यास एक तासापेक्षा अधिक वेळ लागत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. उपचारासाठी ठराविक रूग्णालयातच दाखल करण्याच्या महामार्गावरील एजंटांचा प्रयत्न हेच उशिराचे कारण ठरत आहे. अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये रूग्णाला तातडीने उपाय मिळणो गरजेचे असल्याने महामार्गादरम्यान ‘ट्रामा केअर सेंटर’ची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वाढत आहे.
या महामार्गावर वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने तीन, तीन अशा सहा लेन आहेत. पहिली लेन जड वाहनांसाठी, दुसरी लेन हलक्या वाहनांसाठी तर तिसरी लेन ओव्हरटेक साठी आहे. या सर्व लेनसाठी वेगमर्यादाही ठरवून दिल्या आहेत. मात्र, नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणो वाहने सुसाट धावतात. दरम्यान, अपघात झाल्यास मोटारीसह त्यातील प्रवासीही जखमी होतात. डोक्याला अथवा शरीरावर मार लागून गंभीर जखमी झाल्यास त्याला तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज असते.
त्यासाठी मोठय़ा रूग्णालयात दाखल करणो आवश्यक असते. मात्र, राज्यातील पहिलाच द्रुतगती महामार्ग अशी ओळख असलेल्या या मार्गावर एकही ‘ट्रामा केअर सेंटर’ नाही. त्यामुळे रूग्णाला 5क् ते 55 किलोमीटर अंतर कापून रूग्णालयात दाखल करावे लागते.
अपघातातील जखमीला नेमका कुठे मार लागला आहे. रक्तस्त्रव कुठून होत आहे. याबाबत लगेच समजत नाही. काहीजण बेशुद्धावस्थेत असतात. श्वास कोंडलेला असतो. अशा रूग्णांना तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज असते. जितका जास्त वेळ लागेल तितके जिवितास धोकादायक ठरू शकते. यामुळे महामार्गावरच सर्व सुविधांनी युक्त असे रूग्णालय उभारणो गरजेचे आहे.
वाहतूककोंडीचा करावा लागतो सामना
4लोणावळ्यात एखादा मोठा अपघात झाल्यास त्यातील जखमीला पिंपरी-चिंचवड अथवा पुण्यातील रूग्णालयात हलवावे लागते. लोणावळा ते पिंपरी-चिंचवड 54 किलोमीटर अंतर आहे. यातील लोणावळा ते देहूरोड 44 किलोमीटरचे अंतर 48 मिनिटात कापले जाते. द्रुतगती महामार्ग देहूरोड येथे संपतो. त्यामुळे देहूरोडपासून शहरात येताना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. हे दहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी पुन्हा 2क् ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो. जितका अधिक वेळ जातो तितका रूग्णाच्या जिवाच्या धोकाही वाढत जातो. वाहतूककोंडीवरही उपाययोजना करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
जीव गमावण्याची वेळ
4शंभर किलोमीटर लांबीचा महामार्ग, त्यावर धावणा:या वाहनांचा वा:याचा वेग चालकाची थोडीशी चूक अथवा समोरच्या वाहनचालकाची चूक अपघाताला निमंत्रण देते. अपघातातील जखमीसाठी ‘ना रूग्णालयाची व्यवस्था ना ट्रामा केअर सेंटर’ तातडीची वैद्यकीय मदत न मिळाल्याने जीव गमाविण्याची वेळ येते.
अपघाताबाबत उपाययोजना कमी
4पुणो-मुंबई या द्रुतगती महामार्गावरून दररोज जाणा:या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात आहे. अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, ते रोखण्यासाठी उपाययोजना कमी पडत आहेत. जखमींना उपचार मिळण्यासही अवधी लागत आहे. यासाठी रस्ते विकास महामंडळाने प्रयत्न करणो गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.
डोक्याला मार अथवा रक्तस्त्रव झालेल्या रूग्णांना तातडीने उत्तम दर्जाची वैद्यकीय उपचार मिळणो गरजेचे असतात. गंभीर जखमी असलेल्या रूग्णाची पूर्ण तपासणी करून साधारण एका तासाच्या आत त्याच्यावर उपचार होणो गरजेचे आहे. तातडीने उपचार न मिळाल्यास जिवास धोका निर्माण होऊ शकतो.
- एस. एस. साठे
शल्य चिकित्सक, औंध जिल्हा रूग्णालय
रुग्णवाहिकेत स्पर्धा
4अपघातानंतर जखमीला रूग्णवाहिकेत नेण्यासाठीही स्पर्धा असल्याचे पहायला मिळते. या महामार्गावर पिंपरी-चिंचवड व नवी मुंबईतील खासगी रूग्णालयांच्या रूग्णवाहिका ठिकठिकाणी उभ्या असतात. त्यांचे महामार्गावरील टोल नाके, क्रेनचालक, पोलीस यांच्यात भक्कम नेटवर्क आहे. घटनास्थळावर तातडीने रूग्णवाहिका पोहचण्यासाठी या यंत्रणोची मोठी मदत होते. यामध्ये शासनाच्या रूग्णवाहिका घटनास्थळार्पयत पोहचू दिल्याच जात नाहीत. यातून संबंधित रूग्णवाहिका चालक व रूग्णालयाचा फायदा होत असला तरी वेळेत उपचार न मिळाल्याने रूग्णाला जीवाला मुकावे लागते. अथवा जखमीला खर्चाला भरुदड बसतो.
येथेही पाहिला जातो फायदा..
4कोणत्या जखमीच्या उपचारात कसा फायदा होईल, याचा विचार करूनच रूग्णाला उचलले जाते. अलिशान मोटारीचा अपघात असल्यास त्यांच्या दिमतीला मोठी फौजच उभी राहते. मात्र, ट्रकचालक अथवा एखाद्या मालवाहू वाहनातील जखमीला रूग्णालयात हलविण्यास नेहमीच्या रूग्णवाहिकांकडून टाळाटाळ केली जाते.
रुग्णवाहिका-कंपन्यांचे लागेबांधे
4महामार्गावरील संबंधित रूग्णालयाच्या रूग्णवाहिका आणि रस्त्याची देखभाल दुरूस्ती करणा:या कंपनीचे लागेबांधे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अपघात होताच तातडीने संबंधित रूग्णवाहिकेला कळविले जाते. किरकोळ जखमीवर घटनास्थळी उपचार न करता थेट रूग्णालयात दाखल केले जाते. त्यानंतर रूग्णवाहिकेच्या भाडय़ासह सर्वच खर्च त्याच्याकडून वसूल केला जातो. जवळच्याच रूग्णालयात दाखल करा, अशाप्रकारे जखमीकडून होत असलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष केले जाते.