बारामती: बारामतीकरांनेा थोडासा दम धरा ,आणि इथुन पुढे फक्त माझ एका, बाकी कोणाच ऐकू नका. बाकीच्यांच लय वर्ष कोणाकोणाच ऐकले.आता माझ ऐका. मी तुम्हाला अस काही करुन दाखवितो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली. बारामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांनी पवार कुटुंबातील झालेल्या वेगवेगळ्या राजकीय भुमिकेवर शिक्कामोर्तब केले.तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले ,काम करण्याचा प्रत्येकाचा उमेदीचा ,मधला काळ असतो. आम्ही वरिष्ठांनी सांगितले तसे काम केले. सर्व राष्ट्रवादीमय करण्याचा प्रयत्न केला. १९६७ ला विधानसभेत इथ नविन नेतृत्व १७ हजाराने निवडुन आले. ७२ ला ३४ हजाराने,१९७६ ला १८ हजाराने, १९८० ला २५ हजाराने निवडुन आले. १९८५ ला निवडणुकीत विरोधी उमेदवार १८ हजाराने पडला. आम्ही काही तरुणांनी १९८७ ला काम करण्यास सुरवात केली. त्यानंतर १९९० ला ती जागा आपण १ लाख मतांनी निवडुन आली. त्यानंतर आपण कधीच मागे पाहिले नाही.सतत लाखांच्या पुढे गेलो. बारामतीकरांनी लोकसभेला मला साडेतीन लाखांनी निवडुन दिले, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.
बारामतीकरांच्या भक्कम पाठींब्यावर मी आज उपमुख्यमंत्री, अथर्मंत्रीपदापर्यंत पोहचलो. जोपर्यंत बारामतीकर माझ्या पाठीशी आहेत. तोपर्यंत मी विकासकामांना कमी पडणार नाही. मात्र, मला सर्वांना सांगायच आहे, तुम्हाला कठोर भुमिका घ्यावी लागेल. ज्याला माझ्या बरोबर रहायच आहे. त्यांनीच रहावे. इकडेपण तिकडेपण चालणार नाही. मी कामात कमी पडणार नाही. ज्यांना इतर ठीकाणी जायचे त्यांनी जावे, त्यांचा तो अधिकार आहे. कृषि विकास प्रतिष्ठानच्या फाइलवर मी पुढाकार घेवुन सही घेतली. तुमचे कोणतेही काम माझ्याकडुनच होणार.दुसरे कोणी आजच्या घडीला तरी काम करु शकत नाही. कारण आम्ही सरकारमध्ये आहाेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माझे चांगले सबंध आहेत. यापुर्वी मी सतत मागे असे. वडीलधाऱ्यांनी सर्व पहावे हि माझी भुमिका होती.आज या निमित्ताने माझ्या मोठ्या लोकांच्या ओळखी वाढल्या. त्यातुन माझे काम सांगितले कि ते करतात. माझ्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ,चांगला भाव मिळण्यासाठी इथेनाॅल प्रश्सनासाठी अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे पवार म्हणाले.
....देशपातळीवर मोदी यांच्याशिवाय कणखर नेतृत्व नाही
माझ्या भुमिकेवर आज देखील मोठी चर्चा होते.पण बारामतीकरांना एकच शब्द देतो,मी घेणाऱ्या प्रत्येक भुमिकेत बारामतीकरांचे हित आहे. ज्या दिवशी त्यामध्ये बारामतीकरांचे हित नसल्याचे समजल्यावर वेगळी भुमिका घेतल्याचे देखील बारामतीकरांना पहायला मिळेल. पण आज अनेक दिग्गज नेते आहेत. अनेकांना जवळुन पाहिले. मात्र, आज देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कणखर नेतृत्व नाही. मल्लीकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे आले आहे. तुम्ही खर्गे आणि नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर आणा, भारतीय नागरीक कोणाला मतदान करणार, लोकसभा निवडणुकीचे मतदान पंतप्रधानांचा चेहरा पाहुनच होईल.मोदी यांच्या कामाचे अनेक दाखले देवु शकतो, हि वस्तुस्थिती आहे. देशाचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली विकास झाला, अशा शब्दात अजित पवार यांनी मोदी शहा यांचे काैतुक केले . अशा शब्दात पवार यांनी मोदी यांचे काैतुक केले.