भिगवण : भिगवण-राशीन मार्गावरील पुलाला अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कठडे बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे आल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.भिगवण राशीन रस्त्यावर गेल्या आठवड्यात दुचाकीवरील तरुणाच्या गाडीचा पुढील टायर फुटून त्याचा उजनीच्या खोल पाण्यात पडून मृत्यू झाला होता. २७ तास उलटल्यावर भिगवण पोलीस आणि तहसीलदार यांच्या दक्षतेने पाणबुडी पाचारण करीत त्याचा मृतदेह शोधला होता. पुलाला कठडे असते तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता. या ठिकाणी कठडे तुटल्याने अनेक अपघात घडले होते.या तरुणाच्या अपघातामुळे नागरिकात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्काळजीपणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या अनास्थेबाबत ‘लोकमत’ने दखल घेत वृत्त दिले होते.या ठिकाणी कठडे बांधण्याची मागणी भिगवणचे उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी केली होती. तरीसुद्धा कठडे बांधण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.पुणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी घटना स्थळाला भेट देत अपघातात जीव गमाविलेल्या तरुणाला श्रद्धांजली वाहत परिसराची पाहणी केली. यानंतर वाकसे यांनी कठडे न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता.याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाºयांनी सूचना देत कठड्याचे काम करण्या बाबत सूचना केल्या होत्या.
राशीन पुलाच्या कठड्यांना मिळाला मुहूर्त, प्रशासनाला आली जाग प्रशासनाला आली जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:32 AM