पुणे : शिरुर, हवेलीचे माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे (वय ७१) यांचे आज ११.४३ वाजता शिरूर येथे निधन झाले. शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात पाचर्णे यांच्यावर उपचार सुरू होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ दिवसांपूर्वी त्यांची भेट घेतली होती.
पाचर्णे यांनी चार वेळेस विधानसभेची निवडणूक लढविली आहे. २००४ मध्ये त्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार पोपटराव गावडे यांचा पराभव केला होता. २००९ विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता. पाचर्णे हे भाजप चे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकवर्तीय होते. शिरूर हवेली तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता.
दुपारी एक ते तीन वाजे पर्यंत पार्थिव दर्शन पाचर्णे रेस्टहाउस बाबूराव नगर येथे असणार आहे. दुपारी तीन वाजता बी जे कॉर्नर पुणे नगर शिरुर येथे आणण्यात येईल. अंत्यविधी सायंकाळी ४ वाजता शिवतारा कृषि पर्यटन तर्डोबाचीवाडी शिरुर येथे होईल.