शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

सायबर हल्ल्यातील प्रोव्हीजनची परवानगी द्यावी : कॉसमॉस बँकेची रिझर्व्ह बँकेकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 7:24 PM

कॉसमॉस बँकेवर गेल्यावर्षी ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये कोट्यवधींची रक्कम लुटून नेली होती.

ठळक मुद्दे हॉंगकॉंग येथील हेनसेंग बँकेतील खात्यात यातील रक्कमेचा मोठा भाग जमा ती रक्कम मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारचे मदत करण्याचे आश्वासन

- विशाल शिर्के - पुणे : सायबर दरोड्यातील ९४ कोटी ४२ लाख रुपयांची समान भागात पुढील तीन आर्थिक वर्षांतील ताळेबंदामध्ये प्रोव्हीजन करण्याची  परवानगी द्यावी अशी मागणी कॉसमॉस बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) केली आहे. त्यामुळे बँकेच्या नफ्यात एकदम मोठी घट होणार नाही. तसेच, बँकेच्या सभासदांना देण्यात येणाºया लाभांशामध्ये देखील फारशी घट होणार नाही. कॉसमॉस बँकेवर गेल्यावर्षी ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये कोट्यवधींची रक्कम लुटून नेली होती. या प्रकरणी पोलिसांनी देशातील काही आरोपींना देखील अटक केली आहे. मात्र, लुटीतील रक्कमेपैकी जवळपास ९२ कोटी रुपये देशाबाहेर गेले आहेत. त्यातील १३.९२ कोटी रुपये स्विफ्ट व्यवहाराद्वारे गेले आहेत. हॉंगकॉंग येथील हेनसेंग बँकेतील खात्यात यातील रक्कमेचा मोठा भाग जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. हॉंगकॉंगमधील बँकेच्या खात्यात जमा झालेली रक्कम बँकेला मिळवून देण्याचे आश्वासन परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंग यांनी बुधवारी बँकेच्या संचालकमंडळाला दिले आहे. दरम्यान, बँकेवर हल्ला झाल्यानंतर बँकेच्या अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम काढल्या गेली. त्याचा फटका बँकेने ग्राहकांना बसू दिला नाही. संपूर्ण दरोड्यातील तोटा बँकेने स्वत:च्या ताळेबंदात जमा केला आहे. मात्र, बँकेच्या ताळेबंदावर याचा भार पडल्यास बँकेच्या सभासदांना या आर्थिक वर्षांत लाभांश न मिळण्याचा अथवा अल्प प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. कारण, सायबर हल्ल्यातील रक्कम बँकेच्या नफ्यातून वजा होईल. तर, नफा कमी झाल्यास लाभांश देखील त्या प्रमाणात घटेल. या बाबत माहिती देताना कॉसमॉस को ऑपरेटीव्ह बँक समुहाचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर म्हणाले, परदेशात गेलेल्या रक्कमेपैकी एक मोठा भाग हॉंगकॉंगमधील बँकेच्या खात्यात आहे. ती रक्कम मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सायबर हल्ल्यात गेलेल्या रक्कमेपैकी एकही पैसा बँकेला परत मिळालेला नाही. त्यामुळे ही रक्कम बँकेच्या नफ्यातून कमी होईल. मात्र, या वर्षीच्या ताळेबंदामध्ये या मोठ्या रक्कमेचा भार पडू नये यासाठी येत्या तीन आथिक वर्षांच्या ताळेबंदामध्ये प्रोव्हीजन करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आरबीआयकडे केली आहे. बँकेवर अशा पद्धतीने सायबर हल्ला होण्याची ही अपवादात्मक घटना आहे. त्याचा विचार करुन ताळेबंदात तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसे झाल्यास संबंधित रक्कम तीन हप्त्यात विभागली जाईल. त्यामुळे बँकेच्या नफ्यात एकदम घट दिसणार नाही. बँकेच्या सभासदांना त्या प्रमाणात अधिक लाभांश देता येईल. 

टॅग्स :Puneपुणेbankबँकcyber crimeसायबर क्राइम