पुणे : बांधकाम परवानगी व नोंदीसाठी २०१०मध्ये ग्रामपंचायतींना घातलेली बंदी लवकरच उठण्याची शक्यता असून, तशी मागणी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने विभागीय आयुक्त, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत या विषयावर चर्चा होऊन परवानगीसाठी पीएमआरडीएकडून हिरवा कंदीलही मिळाला असल्याचे समजते.१० फेब्रुवारी २०१० रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यात बांधकाम आराखडे मंजूर करणे, पूर्णत्वाचा दाखला देण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची असून, गावठाण हद्दीत कोणत्याही बांधकामाला परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नसल्याचे कळविले होते. त्यामुळे ग्रामपंचायतींचे सुमारे १०० कोटींच्या आसपास नुकसान झाले. मुळात हा निर्णय अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने घेतला; मात्र त्यातून अपप्रवृत्तींचीच वाढ झाली, असा आरोप करून हे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतींना मिळावेत, अशी मागणी गेली ५ वर्षे होत आहे.जिल्हा परिषदेने यापूर्वी तसा ठरावही केला आहे. आता विभागीय आयुक्त, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे बांधकाम परवानगी व नोंदी करण्याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायती देणार बांधकाम परवानगी?
By admin | Published: February 26, 2016 4:28 AM