नियमांची ऐशीतैशी
“नवीन बांधकाम नियमावलीत ‘रूफ टॉप’ वापरताना त्याच्या वापरापूर्वी गच्चीत अत्यावश्यक सुरक्षा, सोयीसुविधांसह स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे़ लिफ्ट, दोन स्वतंत्र जिने, सुरक्षित स्वयंपाकघर यासाठीच्या नियमांना फाटा देत शहरात आजमितीला शेकडो व्यावसायिकांकडून ‘रूफ टॉप’चा वापर केला जात आहे. मात्र यातल्या बहुतेकांनी अधिकृत परवानगी घेतली नसल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागातील सूत्रांनी सांगितले.
चौकट
अनाधिकृत टेरेस हॉटेलांवर नाही कारवाई
मुंबईत सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘रूफ टॉप’ला आग लागली. तेथून चढ-उतार करण्यासाठी एकच जीना असल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी पोचता आले नाही आणि मोठी दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील ‘रूफ टॉप’वर कारवाईही केली होती़ मात्र ती थंडावल्यानंतर विशेषत: लॉकडाऊन नंतरच्या काळात अनेक ठिकाणी टेरेसवर अनाधिकृत हॉटेलांना पेव फुटले आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सध्या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे़ परंतु या टेरेसवरील अनाधिकृत व्यवसायांवर कारवाई केव्हा होणार, असा स्थानिकांचा प्रश्न आहे.
--------------------------
फोटो तन्मयने काढले आहेत़