पुणे : यापूर्वी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भागातील आणखी काही वस्तूंच्या दुकानांना व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यात प्रामुख्याने इस्त्री व लॉड्री, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहितय तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे पुरवठा, वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी साम्रुगी, फूटवेअर, बांधकाम साहित्य विक्री अशा दुकानांना वारानुसार परवानगी देण्यात आली आहे़.यापूर्वी इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय साहित्य सामुग्री, मोबाईल विक्री व दुरुस्ती इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरुस्ती, भांड्यांची विक्री दुकाने, वाहन दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने याच्याशी संबंधित दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. ही दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी मिळणार आहे. यात महत्वाची अट आहे ती म्हणजे व्यवसाय धारक आणि व्यवसायात काम करणारे कर्मचारी हे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील भागात राहणारे असणे आवश्यक आहे़. दुकानदारांनी कामगारांना फोटोसह ओळखपत्र द्यावे़. दुकानामध्ये काम करताना दोन कर्मचाऱ्यांमध्ये फिजिकल डिस्टंन्सिंग ठेवावे़ दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना मास्क आणि हातमोजे वापरावे़. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही आजारांची लक्षणे दिसल्यास तात्काळ मनपा दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला देऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी. कर्मचाऱ्यांनी हात वेळोवेळी स्वच्छ धुण्यासाठी साबण/ सॅनिटायझरची व्यवस्था करावी व आवश्यक ती सुविधा उपलब्ध करुन द्यावी. दुकानामध्ये शिरताना पायऱ्या आणि बाहेरील भाग १ टक्के सोडियम हायपो क्लोराइट द्रावणाने दररोज फवारणी करावी. दुकानाचे काऊंटर गिºहाईक सोडून गेल्यानंतर १ टक्के हायपो क्लोरट द्रावणाने पूसून द्यावी. दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकाने देखील मास्क घालणे आवश्यक आहे़.दुकानामध्ये वस्तू खरेदीसाठी गर्दी होऊ नये व सुरक्षित अंतर राहावे म्हणून नागरिकांना उभे राहण्याच्या जागेवर ६ फुट अंतराच्या खुणा करुन ठेवाव्यात.
वस्तू विक्रीसाठी निश्चित केलेले दिवस व्यवसायाचा प्रकार
*सोमवार-इस्त्री व लॉंड्री दुकान, स्टेशनरी दुकान, वैद्यकीयसाहित्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालाचा पुरवठा करणारा व्यवसाय.*मंगळवार- वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, तयारफर्निचरची विक्री.*बुधवार -इस्त्री व लॉंड्री दून, फुटवेअर, टेशनरी दुकान, वैद्यकीयसाहित्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालाचा पुरवठा करणारा व्यवसाय.*गुरुवार - वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामग्री, तयारफर्निचरची विक्री.*शुक्रवार- इस्त्री व लॉंड्री दुकान, फुटवेअर, बांधकाम साहित्यविक्री, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालाचा पुरवठाकरणारा व्यवसाय.*शनिवार - वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री,इस्त्री व लॉड्री दुकान, बांधकाम साहित्य विक्री, तयार फर्निचरची विक्री.*रविवार- वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी सामुग्री,स्टेशनरी दुकान, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री.