डिंभे: ''पेसा'' घोष वाक्य भिंतीवर रंगवून कायदाची माहिती आदिवासी जनतेस होणार नाही. ही गरज लक्षात घेऊन बहुरंग पुण्याच्या वतीने पेसा जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत दृकश्राव्य माध्यमातून कायदा मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आदिवासी क्षेत्रात पेसा कायदा लागू झाल्याने आदिवासी जनतेच्या विकासासाठी निधी मिळू लागला, परंतु जनजागृतीअभावी आदिवासी जनतेच्या विकासासाठी या निधीचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही. पेसा जनजागृती कडे कोणीही लक्ष दिले नाही. या कायद्याच्या प्रभावी अंलबजावणीसाठी पेसा घोषवाक्य भिंतीवर रंगवून कायद्याची माहिती आदिवासी जनतेस होणार नाही. यासाठी गरज लक्षात घेऊन बहुरंग पुणे यांनी जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत दृकश्राव्य माध्यमातून कायद्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. शासनाच्या २१ एप्रिल २०१५च्या पेसा निधी विनियोग सूत्राप्रमाणे आदिवासी कला संस्कृती संवर्धन केंद्रस्थानी ठेवून आदिवासींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पेसा अंतर्गत पायाभूत सुविधा, स्वच्छता, वनीकरण, वन्यजीव संवर्धन, जैवविविधता संरक्षण, वनपर्यटनाची माहिती दवंडी गीत, ग्रामसभा गीत यातून कायदा माहिती दिली जात आहे असे बहुरंगचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांनी सांगितले आहे.