शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

पुण्याचे पेशवेकालीन वैभव :कात्रज तलावाला अखेरची घरघर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 2:48 AM

पुण्याचे पेशवेकालीन वैभव : गुजरवाडी, भिलारवाडी, मांगडेवाडीच्या नाल्याचे सांडपाणी थेट तलावात

प्रीती जाधव-ओझा 

पुणे : पाण्यावर पसरलेले तेलकट तवंग... वाढलेली झाडे-झुडपे... तरंगणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या व मद्याच्या बाटल्या... हे चित्र आहे कात्रज परिसरातील पेशवेकालीन तलावांचे. नगरपालिकेने नानासाहेब पेशवे तलाव परिसरात सुशोभीकरण केले; मात्र पाण्यात साचलेल्या कचरा-घाणीमुळे हे काम पाण्यातच गेले आहे. एकेकाळी पुण्याचे प्रेक्षणीय स्थळ समजले जाणाºया पेशवेकालीन तलावात सांडपाणी सोडले जात आहे. अशा परिस्थितीत पेशवेकालीन तलावाचा श्वास गुदमरत आहे. या तलावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. या तलावाची स्वच्छता करणे गरजेचे झाले आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाने पाण्यापेक्षा अधिक आसपासच्या गावांमधील कचरा जमा झाला आहे. विशेष बाब म्हणजे या तलावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले असल्याने तलावाच्या काठावर थर्माकॉल, प्लास्टिक, तसेच वैद्यकीय कचºयाचे घटकही अस्ताव्यस्तपणे पसरलेले असून, हा कचरा काढून घेण्याची मागणी तलावाच्या परिसरातील नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली आहे.प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

महापालिकेकडून या उद्यानात सर्वांत उंच राष्ट्रध्वज बसविण्यात आलेला असून, या भागातील तलावाच्या काठाचे सुशोभीकरणही केलेले आहे. तसेच या ठिकाणी फुलराणीही बसविण्यात आली आहे. त्यामुळे या तलावावर सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी येणाºया तसेच सुट्टीच्या दिवशीही नागरिकांची मोठी संख्या असते. मात्र, या तलावाच्या काठावर साचलेल्या कचºयामुळे या तलावाला कचरा डेपोचे स्वरूप आल्याचे चित्र असून, या तलावाकडे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.तलावाचे अस्तित्वच धोक्यात1 हा पेशव्यांनी बांधल्याचा उल्लेख सापडतात. नगरपालिकेने या तलावाचे सुशोभीकरण केले आहे. परिसरात मोफत वायफाय सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिवसभर येथे तरुणांची लगबग सुरू असते. प्रेमी युगुलांसाठी हे हक्काचे ठिकाण बनले आहे. सकाळी, सायंकाळी परिसरातील नागरिक येथे फिरण्यास, चालण्यासाठी येतात.2 लोकांची गरज बनलेल्या या तलावाच्या पाण्यावर प्रचंड घाण पसरली आहे. अस्वच्छतेमुळे सुशोभीकरणाच्या हेतूलाच नख लागले आहे. प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणात आहे. हा कचरा काढून घेण्यासाठी मागणी तलावाच्या परिसरातीलनागरिकांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली आहे. विशेष बाब म्हणजे या तलावाच्या सुशोभीकरणासाठी गेल्या काही वर्षांत कोट्यवधीचा निधीचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, या वाढत्या कचºयामुळे व सांडपाण्यामुळे य तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.‘सुशोभित पेशवेकालीन तलाव घाणीच्या विळख्यातकात्रज येथील या तलावात गुजरवाडी, निंबाळकरवाडी, भिलारवाडी तसेच मांगडेवाडी आणि कात्रजच्या घाटमाथ्यावरून येणारे नाले तसेच ओढ्यांचे पाणी येते. त्यात हे ओढे ज्या गावांमधून येतात, त्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापन तसेच सांडपाण्याची योग्य प्रकारे व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांकडून कचरा तसेच सांडपाणी या नाल्यांमध्येच सोडले जाते.गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे या तलावात हे नाले तसेच ओढ्यांमध्ये साचलेला कचरा थेट या पेशवेकालीन तलावात आलेला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधी येत आहे. या तलावातील पाण्यात नागरिक निर्माल्य टाकतात. याव्यतिरिक्त प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या व मद्याच्या बाटल्यांचा खचही दिसून येतो. तलावाला झाडा-झुडपांनी वेढले आहे. लगतच नगरपालिकेने मुलांना खेळण्यासाठी आजी-आजोबा उद्यान उभारले आहे. दिवसा मुले खेळतात, तर रात्री या जागेचा ताबा मद्यपी घेत आहेत. मद्याच्या बाटल्या; तसेच खाद्यपदार्थांच्या पिशव्या तलावातील पाण्यात टाकण्यात येत आहेत.

टॅग्स :Puneपुणे