पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ई-तिकिटिंगमध्ये गैरप्रकार होत असल्याचा दावा करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याबाबत महाराष्ट्र कामगार मंचने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दि. ११ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. ‘पीएमपी’च्या बहुतेक बसेसमध्ये सध्या ई-तिकिटिंग प्रणाली वापरली जाते. तसेच महाराष्ट्र शासन, पुण महानगरपालिका आयुक्त, पीएमपी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, श्रीकर परदेशी यांच्यासह अकरा जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मंचचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये ई-तिकिटिंगमध्ये भ्रष्टाचार आणि फसवणूक झाली असून त्याची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, असे नमूद करण्यात आले आहे.
ई-तिकिटिंगबाबत याचिका
By admin | Published: March 29, 2017 2:57 AM