पिंपरी (पुणे) : दोन ते तीन वर्षांपासून क्रुड तेलाचे भाव कमी असताना भारतामध्ये अनेक कर लावल्याने किरकोळ डिझेल व पेट्रोलचा दर जास्त आहे. आता क्रुड तेलाचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे वर्षभरात पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडतील, अशी शक्यताउद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.कार्यक्रमासाठी शहरात आलेले देसाई पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘‘केंद्र सरकाराचा आज सादर झालेला हा अर्थसंकल्प निवडणुकीपूर्वीचा आहे. त्यामुळे त्यात शेतीसाठी अधिक काही सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्याची फारशी छाप पडली नाही. शेतकºयांना पूर्ण मदत केली पाहिजे. कर्जमाफी, शेतकºयांना लागणारी साधनसामग्री व उत्पादन खर्च यामध्ये भरीव मदत करावी.त्यांना आधार द्यावा. अन्यथा शेतकºयांच्या हालअपेष्टा थांबणार नाहीत.’’भाजपने निवडणुकीपूर्वी स्वामीनाथन समितीचा अहवाल अमलात आणण्याचे वचन दिले होते. अहवालात शेतकºयांच्या उत्पादनाला दीडपट भाव मिळाला पाहिजे हे महत्त्वाचे तत्त्व आहे. अर्थमंत्री जेटली यांनी २०२२ पर्यंत शेतकºयांना दीडपट भाव देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे २०१८ ते २०२२ या काळात शेतकरी हा केवळ आशेवर राहणार आहे, असेही देसाई म्हणाले.
पेट्रोल-डिझेलचे भाव आणखी भडकणार - सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 1:58 AM