'...कशी तुझी जिरवली आता भर शंभरचं!'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 03:26 PM2021-09-25T15:26:46+5:302021-09-25T17:16:01+5:30
बारामती: अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा ( पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा) फोटो लावायचाच असा नियम केला ...
बारामती: अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा ( पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गंमतीने असे म्हणतो की पेट्रोल १०० च्या पुढे गेलं की पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली... घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल अशा शब्दात मिश्कील टीप्पणी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. त्यातच बहुतांश पेट्रोलपंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी एमआयडीसीतील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेली मिश्कील टीप्पणी चर्चेचा विषय ठरली आहे.
'पवारांचा पेट्रोल पंप असला तरीही फोटो मात्र मोदींचाच'- अजित पवार
यावेळी पवार म्हणाले, आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेक उत्तम प्रकारे काम करणारे पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदी साहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे.पेट्रोल भरताना त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली. घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल या पवार यांनी पंतप्रधानांना केलल्या टीपणीवर उपस्थिांमध्ये हशा पिकला.
वाढत्या इंधनदरावर सर्वसामान्य ग्राहक पेट्रोलपंपावर इंधन भरताना या ठीकाणी लावलेल्या पंतप्रधानांच्या फ्लेक्सकडे पाहत उपरोधिकपणे हात जोडल्याचे काही व्हीडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. आता खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिश्कील टीप्पणी करीत दरवाढीकडे लक्ष वेधले आहे.