पुणे : इंधनाची भाववाढ सुरुच असून, शहरात सोमवारी (दि. २४) पेट्रोलचा प्रतिलिटर दर ९० रुपयांवर गेला. डिझेलचे प्रतिलिटर भाव ७७.२५ रुपये झाले असून, पॉवर पेट्रोल ९२.७० रुपयांवर पोचला आहे. इंधनाच्या भाव वाढीतील हा उच्चांक आहे. शहरात २८ डिसेंबर २०१७मध्ये पेट्रोलचे प्रतिलिटर भाव ७७.६६, डिझेल ६२ आणि पॉवर पेट्रोलचा दर ८०.४० रुपये होता. कर्नाटक निवडणूकीदरम्यान इंधनाच्या भावात वाढ झाली नाही. त्यानंतर दुप्पट वेगाने १५ ते २० दिवस पेट्रोल-डिझलेच्या भावात वाढ नोंदविण्यात आली होती. मे महिना अखेरीस पेट्रोलचे भाव ८६.०७ आणि डिझेलचे भाव ७२.५१ रुपयांवर गेले होते. त्यानंतर जून अखेरीस पेट्रोलचे भाव ८३.२९ आणि डिझेलचे भाव ७०.५३ रुपयांपर्यंत खाली आले. गेल्या काही दिवसांपासून १० ते ३० पैसे प्रतिलिटर प्रमाणे इंधनाच्या भावात जवळपास दररोज वाढ होत आहे. गेल्या नऊ महिन्यांत पेट्रोलच्या भावात प्रतिलिटरमागे १२.३४, डिझेल १५.२५ आणि पॉवर पेट्रोलच्या भावात १२.३० पैसे प्रतिलिटरने वाढ झाली आहे.
शहरात पेट्रोलचा भाव पोहोचला नव्वदीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 9:06 PM
गेल्या काही दिवसांपासून १० ते ३० पैसे प्रतिलिटर प्रमाणे इंधनाच्या भावात जवळपास दररोज वाढ होत आहे.
ठळक मुद्देगेल्या नऊ महिन्यांत पेट्रोलच्या भावात प्रतिलिटरमागे १२.३४, डिझेल १५.२५ रुपयांनी वाढ