पुणे : देशातील ७२ हजार पेट्रोल पंपावरच्या ७ लाख कामगारांना कोरोना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्यावा, अशी शिफारस पेट्रोलियम मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला केली. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनने ही मागणी केली होती. ती मान्य करून ही शिफारस केली. असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी ही माहिती दिली. यामुळे या कामगारांंना कोरोना लसीकरणात प्राधान्य मिळेल, असे दारूवाला म्हणाले.
कोरोना काळात वर्षभर पेट्रोल पंपावरील कामगारांंनी जीव धोक्यात घालून काम केले. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांंना इंधन पुरवठा केला. या संपूर्ण कालावधीत पेट्रोल पंप कधीही बंद नव्हते. त्यामुळे या कामगारांंना कोरोना फ्रंट लाइन वर्कर्स समजून त्यांना लसीकरणात प्राधान्य मिळेल, असा विश्वास दारूवाला यांनी व्यक्त केला.