पुणे : गेल्या सहा महिन्यांत अपवाद वगळता पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून, इंधनाच्या दाराने गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली असल्याचे पेट्रोल डिलर असोसिएशन मधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातही डिझेलचा भाव अवघ्या सहा महिन्यांत प्रतिलिटरमागे दहा रुपयांनी वाढल्याने डिझेलचे भाव पेट्रोलच्या दराशी स्पर्धा करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.सध्या शहरात पेट्रोलचा प्रतिलिटर भाव ८२.३३, डिझेल ६९ आणि पॉवर पेट्रोलचा भाव ८५.१० रुपये इतका झाला आहे. गेले काही महिने सातत्याने डिझेल आणि पेट्रोलच्या भावात वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात अगदी दररोज चार ते पाच पैशांपासूनवीस ते पंचवीस पैशांची वाढहोत आहे. सलाइनप्रमाणेथेंबा-थेंबाने होणारी भावातीलवाढ फारशी जाणवत नाही.गेल्या सहा महिन्यांचा आढावा घेतल्यास डिझेलच्या भावात प्रतिलिटर तब्बल दहा रुपये ५० पैशांची वाढ नोंदविण्यात आली, तर पेट्रोलचे भाव लिटरमागे ४ रुपये ३० पैशांनी वाढले आहेत.पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दर वाढीचा वेग जास्त आहे. आॅक्टोबर २०१७मध्ये डिझेल ५८.४७ रुपये प्रतिलिटर होते. त्यात दहा रुपयांनी वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलमधील ही तफावत १३ रुपये ३० पैशांची आहे. ही तफावत ३० रुपयांच्या घरात असायची. त्यामुळे मध्यम वर्गीयांचा भरणा डिझेल कार घेण्याकडे जास्त असायचा. या भाववाढीमुळे त्यांच्या खिशाला देखील कात्री बसत आहे. या शिवाय मालवाहतूक करणाºयांना डिझेलच्या दरवाढीने दणका दिला आहे. त्यामुळे वाहतूक भाड्यात वाढ होऊन, खाद्यान्नासह सर्वच वस्तूंच्या भावात वाढ झाली आहे. महाराष्ट्र वाहतूकदार मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की, गेल्या दोन-तीन वर्षांत डिझेलच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. विविध कंपन्यांबरोबर मालवाहतूकदारांचा वार्षिक करार असतो. सातत्याने डिझेलच्या भावात मोठी वाढ झाल्यास, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अधिक भाववाढ झाल्यास त्याचा बोजा सामान्य नागरिकांवर टाकण्यावाचून गत्यंतर राहत नाही.
डिझेलची स्पर्धा पेट्रोलच्या दराशी, गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 3:55 AM