पशुवैद्यकिय दवाखाना एका गावात तर सभोवतालची अनेक गावे चार पाच किलोमीटरच्या अंतरावर यामुळे जनावरांच्या उपचारासाठी पशुवैद्यकिय अधिका-यास चांगलीच कसरत करावी लागते अपघात ग्रस्त जनावरांना त्वरीत सेवा देण्यासाठी राज्य शासणाच्या वतीने पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातुन पुरंदर तालुक्याला सुसज्ज अशी पशुवैद्यकिय अम्बुलन्स देण्यात आली. पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथे माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांच्या हस्ते अम्बुलन्सचे पुजण करण्यात आले यावेळी माळशिरसचे माजी सरपंच एकनाथ तात्या यादव,माजी उपसरपंच माऊली यादव,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय डोंबाळे,दिलीप मोरे ,माजी ग्रामपंचायत सदस्य शांताराम यादव,सुरेश गायकवाड,माळशिरस ग्रामसेविका सोनाली पवार,नायगाव पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.भिसे उपस्थित होते.
माळशिरस येथे पशुवैद्यकिय अम्बुलन्सचे पुजण करताना सरपंच महादेव बोरावके व इतर