वाघोली : पुणे-नगर महामार्गालगत हॉटेल कांचन समोरील टपरी शेजारी उभी असलेली जिप्सी कार एका इसमाने पेटवून दिल्याची घटना बुधवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. गाडी पेटविल्याची घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झाली असून कारच्या शेजारी असणाºया टपरीतील एक लाखाचा माल जळून खाक झाला आहे. जाळपोळ प्रकरणी हॉटेलचे मालक दिनेश गुप्ता यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे.या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गालगत वाघोली गावच्या हद्दीमध्ये खांदवेनगर परिसरात वाघोली-लोहगाव शिवेवर हॉटेल कांचन आहे. बुधवारी रात्री एकच्या सुमारास हॉटेल पूर्ण बंद करून मालक दिनेश गुप्ता घरी गेले होते.हॉटेल समोर असणाºया टपरीशेजारी त्यांनी त्यांची जिप्सी कार लावली होती. रात्री दीडच्या सुमारास टपरीच्या समोरील बाजूने येऊन एक इसमाने कारवर पेट्रोल ओतून आग लावली व फरार झाला. रस्त्याने जाणाºया नागरिकांनी या बाबतची माहिती अग्निशमन दल, नियंत्रण कक्षास कळवून हॉटेल मालकांना कळविली. मालक दिनेश गुप्ता यांना दोनच्या सुमारास कळल्यानंतर तत्काळ हॉटेलसमोर दाखल झाले. पाणी आणि हॉटेलमधील आग प्रतिबंधक सिलिंडरद्वारे आग नियंत्रणातआणली.खासगी वादातून प्रकारआगीमध्ये जिप्सी कारचे इंजिन, सीट, मागील बाजू पूर्णपणे जळून खाक झाले आहेत तर टपरीतील एक लाखाचे साहित्य जळून खाक झाले आहे.आगीमध्ये रविवारी (३० जुलै) रोजी याच कारची काच दगड मारून फोडल्याची घटना घडली होती. बुधवारी रात्री कार पेटवून देण्यात आली. खासगी वादातून गाडीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कांचन हॉटेलसमोर पेटवली कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:08 AM