पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमास बुधवारी विद्या परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या मे महिन्यात पीएच. डी. प्रवेशास सुरूवात होणार आहे.विद्यापीठाच्या विविध विभागातील व संलग्न महाविद्यालयातील पीएच.डी.च्या जागांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. विद्यापीठातर्फे आॅगस्ट २०१६ मध्ये शेवटची पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. विद्यापीठातर्फे नवीन नियमावलीनुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली. विद्यापीठाने तयार केलेल्या अभ्यासक्रमास विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली.पूर्वी विद्यापीठातर्फे सामान्य ज्ञान विषयाची व संबंधित विषयाची परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पीएच. डी.ला प्रवेश दिला जात होता. परंतु, नवीन नियमावलीनुसार संशोधन पद्धती आणि विद्यार्थ्याने प्राप्त केलेल्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रवार आधारीत परीक्षा घेतली जाईल. दोन्ही विषयांसाठी एकदाच पेपर असेल. तसेच परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्यांची मुलाखत घेऊन प्रवेश निश्चित केले जातील.
पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा
By admin | Published: April 27, 2017 5:06 AM