शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पीएच.डी. संशोधनासाठी पायाभूत सुविधा

By admin | Published: May 13, 2017 5:05 AM

पीएच.डी.चे संशोधन योग्य होत नसल्याची केवळ टीकाच करून थांबणार नसून, या संशोधनासाठी विद्यापीठांना चांगल्या पायाभूत सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पीएच.डी.चे संशोधन योग्य होत नसल्याची केवळ टीकाच करून थांबणार नसून, या संशोधनासाठी विद्यापीठांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. खासगी कंपन्यांच्या उत्कृष्ट लॅबची मदत पीएच.डी. संशोधनासाठी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी स्पष्ट केले.फर्ग्युसन महाविद्यालयातील भारतीय विज्ञान संमेलनाचे उद्घाटन विनोद तावडे, केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ व विज्ञानभारतीचे अध्यक्ष डॉ. विजय भटकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे उपस्थित होते.तावडे म्हणाले, ‘‘नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये बोर्ड आॅफ रिसर्च याची तरतूद करण्यात आलेली आहे. याद्वारे पीएच.डी.ची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पीएच.डी.च्या संशोधनासाठी विद्यापीठांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर चांगल्या कंपन्यांमधील लॅबचीही मदत घेण्यात येईल. कॉपी पेस्ट संशोधन होऊ नये, यासाठी यूजीसीने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.’’संशोधनासाठी ६ टक्के निधीची तरतूद केली पाहिजे;मात्र प्रत्यक्षात ०.२१ टक्के इतकाच निधी संशोधनासाठी उपलब्ध करून दिला जात आहे. या निधीचे प्रमाण दोन वर्षांत ४ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, असे तावडे यांनी स्पष्ट केले.विजय भटकर म्हणाले, ‘‘विज्ञान भारती संमेलनाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. भोपाळ येथे २००७मध्ये या संमेलनाची सुरुवात झाली. या संमेलनात संस्कृत, हिंदी, मराठी आदी भारतीय भाषांमध्ये शोधनिबंध मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या संमेलनातून निश्चितच नवी दृष्टी मिळेल.’’