पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच.डी. व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांना दरमहा दिले जाणारे विद्यावेतन मागील महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. विद्यापीठाकडे यासाठी निधी नसल्याने विद्यावेतन बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासाठी विद्यापीठाकडे निधी नाही; मग अधिकारी व कर्मचाºयांना अतिरिक्त भत्ते कसे दिले जातात, अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार, तर एम.फिल.च्या विद्यार्थ्यांना दरमहा ३ हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुदानातून हे विद्यावेतन सुरू करण्यात आले होते. गेल्या एक वर्षांपासून यूजीसीचे अनुदान बंद झाले आहे. त्यानंतर विद्यापीठ फंडातून विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू ठेवण्यात आले होते. मात्र अचानक ते बंद करण्यात आले आहे. अचानक विद्यावेतन बंद करण्याचा एनएसयूआयकडून तसेच इतर विद्यार्थी संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. लवकरात लवकर विद्यावेतन सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.भारतीय विद्यार्थी काँग्रेसकडून (एनएसयूआय) याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना निवेदन देण्यात आले. देशातील ९ क्रमांकावर असणाºया विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना गेल्या महिन्यापासून अधिछात्रवृत्ती मिळाली नाही. यासाठी विद्यार्थ्यांना पी.जी. आॅफिस व फायनान्स आॅफिसला वणवण फिरावे लागत आहे. कुलगुरूंनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून विद्यावेतन सुरू करावे, अशी मागणी एनएसयूआयने केली आहे.पीएच.डी. व एम.फिल.च्या विद्यावेतनाच्या प्रश्नाबाबत एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर विद्यावेतन पुढे चालू ठेवायचे की बंद करायचे याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.विद्यापीठामध्ये जंगलाला कंपाऊंड घालण्याच्या कामावर १७ कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. गोपनीय भत्ते व इतर नावाखाली अनेक अतिरिक्त भत्ते विद्यापीठातील अधिकाºयांकडून घेतले जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. एकीकडे अशा प्रकारे विद्यापीठाच्या निधीची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत ती बंद करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाला कात्री लावण्यात आल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नको तिथे उधळपटट्ी अन विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाला कात्रीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यातील सर्वात श्रीमंत विद्यापीठ आहे. नुकताच विद्यापीठाचा ६४९ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दरवर्षी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचे शुल्क व शासनाचे अनुदान यापोठी कोटयावधी रूपये जमा होतात. यातून जंगलाला कंपाऊंड बांधणे, कार्यालये, घरे यांची रंगरंगोटी करणे, अतिरिक्त भत्ते घेणे अशी प्रचंड उधळपटट्ी केली जात असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. याला रोख लावण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनला कात्री लावण्यात आल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.विद्यार्थी कुलगुरूंच्या कार्यालयी मुक्कामीपीएच.डी. व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांना दरमहा दिले जाणारे विद्यावेतन तातडीने सुरू न केल्यास ‘विद्यार्थी कुलगुरूंच्या कार्यालयी मुक्कामी’ हे आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा एनएसयूआयच्या वतीने देण्यात आला आहे.
पीएचडी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 5:55 AM