शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

दूरदर्शनवरील अमूल्य ठेव्याचे रसिकांना  दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 9:00 PM

एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांचा स्वसंग्रही असलेला ’ बासन- एक चित्रकथी’ हा चित्रफिती आणि श्राव्यफितींचा दुर्मिळ दस्तावेज मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरूण काकतकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त केला आहे.

ठळक मुद्देअरूण काकतकर यांनी दुर्मिळ दस्तावेज: डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्तठेव्याचे स्वखर्चाने डिजिटलायझेशन करून हार्डडिस्कवर तो जतन’बासन’ म्हणजे जुने कपडे आणि ‘चित्रकथी’ ही एक पारंपारिक करमणुकीची कला

पुणे : मोगूबाई कुर्डीकर, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, ज्योत्सना भोळे, पं. वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी, सुधीर फडके,  ही नुसती नाव नाहीत तर भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील अमूल्य अशी रत्ने आहेत. जुन्या पिढीचे स्मरणरंजन होण्याबरोबरच नव्या पिढीला या व्यक्तिमत्वांना समोर बसून ऐकण्याची संधी मिळणार आहे.              एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांचा स्वसंग्रही असलेला ’ बासन- एक चित्रकथी’ हा चित्रफिती आणि श्राव्यफितींचा दुर्मिळ दस्तावेज मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरूण काकतकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त केला आहे. टप्प्याटप्प्याने या अमूल्य ठेव्याचे दर्शन रसिकांना घड्णार असून, येत्या १ सप्टेंबर रोजी या सुंदरमालेतील ‘शांकुतल ते मानापमान’ या नाट्यसंगीताचा मूलस्त्रोत सप्रयोग फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये उलगडला जाणार आहे. तीस ते चाळीस वर्षांपूर्वी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या मान्यवरांना मुंबई दूरदर्शनवर कार्यक्रमांद्वारे सादर करताना अरूण काकतकर यांनी काहींचे खाजगी रेकॉर्डिंग करून ते जतन करण्याचे काम केले आहे. हिराबाई बडोदेकर,मोगूबाई कुर्डीकर, माणिक वर्मा यांनी गप्पा आणि आठवणीतून खुलवलेली मैफल, बाकीबाब, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुरेश भट या कवींची मनोगत तसेच मंगेशकर कुटुंबियांची संवाद आणि गाण्यांची मैफल, राम शेवाळकर, डॉ. जयंत नारळीकर यांची व्याख्याने, अशा नानाविविध दुर्मिळ गोष्टींचा या संग्रहात समावेश आहे. ‘लोकमत’ शी बोलताना अरूण काकतकर म्हणाले, १९७८ ते १९८७ या काळातील साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांचा हा अमूल्य  दस्तावेज आहे. त्यावेळी व्हीएचएस कँसेटच्या माध्यमातून कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग केले होते. या ठेव्याचे स्वखर्चाने डिजिटलायझेशन करून हार्डडिस्कवर तो जतन करून ठेवला आहे. राजेश कनगे या माझ्या सहका-याच्या मदतीने एडिटिंगचे बरेचसे काम करण्यात आले आहे . या दुर्मिळ संग्रहाचे कायमस्वरूपी जतन व्हावे असे वाटत होते म्हणून हा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला द्यायचा विचार होता पण दर महिन्याला दोन तास हा ठेवा रसिकांसाठी खुला करून द्यायचा अशी एक अट ठेवली होती. मात्र, संग्रहालयाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीला हा ठेवा देण्याचे ठरविले. कारण फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँम्फी थिएटरला एक परंपरा आहे. सामान्यांना या ठेव्याचे दर्शन घडावे या उददेशाने ’शांकुतल ते मानापमान’  हा पहिला कार्यक्रम सादर होणार आहे. १९८० साली एफटीआयआयमध्ये हा कार्यक्रम चित्रित केला आहे. नारदीय कीर्तन परंपरा नाट्य संगीताचा मूळ स्त्रोत आहे. नाटककार सुरेश खरे पं. वसंतराव देशपांडे यांच्याशी संवाद साधत हा पट मांडला आहे. पं. वसंतराव आणि आशाताई खाडीलकर यांना ऐकता येणार आहे.     या ठेव्याच्या शीर्षकाविषयी सांगताना ते  म्हणाले, ’बासन’ म्हणजे जुने कपडे आणि ‘चित्रकथी’ ही एक पारंपारिक करमणुकीची कला आहे. डेंगुळी गावात चामड्याच्या बाहुल्या बोटावर नाचवतात आणि मागे दिवा लावलेला असतो समोर प्रेक्षक  बसलेले असतात, किशोर गरड  या फर्ग्युसनच्या विद्यार्थ्याला हे नाव सुचले. पुणे हे सांस्कृतिक शहर असल्याने शहराच्या चौकाचौकात या ठेव्याच्या चित्रफिती लावल्या जाव्यात अशी मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेTelevisionटेलिव्हिजनmusicसंगीतartकला