बारामती : सहलीसाठी नेलेल्या मुलींचे छायाचित्र काढल्याप्रकरणी मुख्याध्यापकांनी संस्थाचालकांना माहिती दिली आहे. मात्र, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शहानिशा करून लेखी अहवाल मागविला आहे. लेखी अहवालानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सचिव अॅड. भगवानराव खारतुडे यांनी दिली. काल हा प्रकार उघड झाल्यानंतर संतप्त पालकांनी शाळेत मुख्याध्यापक, शिक्षकांना जाब विचारला. ‘लोकमत’ने याबाबत आज वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. याबाबत पालकांनी लेखी तक्रार केलेली नाही. मात्र, या प्रकाराची माहिती मुख्याध्यापकांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. तीन शिक्षकांवर पालकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्याची लेखी तक्रार दिलेली नसल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. याबाबत पालकांनी सोमवारी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)
मुलींच्या छायाचित्रप्रकरणी संस्थेने अहवाल मागवला
By admin | Published: December 21, 2015 12:43 AM