हर घर झेंडा उपक्रमात महात्मा गांधी, नेहरू यांचे फोटो कुठेच दिसत नाहीत; नाना पटोलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 12:40 PM2022-08-14T12:40:03+5:302022-08-14T12:40:14+5:30
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा उपक्रम
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात झेंड्याचा सन्मान झालाच पाहिजे. पण सरदार पटेल, महात्मा गांधी, नेहरू असे अनेक जण आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्व बलिदान दिले पण त्यांचे फोटो कुठेच दिसत नसल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पटोले म्हणाले, मोदी यांनी हर घर झेंडा हा उपक्रम राबवला आहे. झेंड्याचा सन्मान झालाच पाहिजे पण सरदार पटेल, महात्मा गांधी, नेहरू असे अनेक जण आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्व बलिदान दिले पण त्यांचे फोटो कुठेच दिसत नाही. नाईक यांचा विचार जर यातून त्यांनी पोहचवला असता तर अजून आनंद झाला असता. फाळणी बद्दल चित्रिफिती दाखवण्याचा निर्णय जो सरकार ने घेतला आहे. या विषयी हिंदू सभा आणि मुस्लीम लीग चे मोठे योगदान आहे. मुस्लीम लीग आणि हिंदू महासभा यांनी देशाला आग लावली. त्यावेळी हे दोघे ही एकत्र होते या दोघांमध्ये फाळणी झाली हे लोकांच्या समोर आले पाहिजे.
अमित शहा यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे
चीन मधून असे झेंडे तयार हून येत असतील. तर मोदी, अमित शहा यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण तिरंग्याचा अपमान होऊ नये. आमची ओळख या ध्वजापासून सुरू होते. हा अपमान सरत्याने केला जातो आहे. हे काम जर भारतीय कामगारांना दिला असता तर त्यांना रोजगार मिळाला असता. आता त्यांना देशाला लुटायचे आहे जसे महाराष्ट्राचे सरकार लोकांना लुटून गुजरात ला फायदा करून देते आहे. पहिल्या कॅबिनेट मध्ये त्यांनी बुलेट ट्रेन ला मंजूर दिली पण शेतकऱ्यांना एक ही मदत नाही असेही पटोले यावेळी म्हणाले आहेत
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तिरंग्याचा मुद्दा आम्ही सरकारला प्रश्न विचारणार
मुख्यमंत्री २० तास कोणासाठी काम करत आहेत हे बघायला पाहिजे. आम्ही रात्री १ वाजेपर्यंत काम करतो. काही लोकांना झोप लागत नसेल. आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो आहे. अतिवृष्टी जिथे झाली तिथे मदत नाही मिळाली. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तिरंग्याचा मुद्दा याबद्दल आम्ही सरकारला प्रश्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.