यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मनीषा कानडे या होत्या. यावेळी वैभव वीरकर म्हणाले की, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रजाहितदक्ष व्यवस्थापन कौशल्य, महात्मा फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेले महिला व मागासवर्गीय समाजाच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अन् युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेलं संविधान आजही भारतवर्षाला सर्वांगीण प्रगतीसाठी दीपस्तंभ आहे. या थोर व्यक्तिमत्वांमुळेच आपण सारे भारतीय समता, बंधुता अन् एकात्मता मूल्ये जोपासत उत्तम नागरिक होऊ या.
कार्यक्रमाचे प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ,महात्मा फुले व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. समीक्षा कानडे व धनश्री वीरकर यांचे हस्ते झाले. सेट-नेट पात्रता परीक्षेत उत्तम यश संपादन केलेबद्दल प्रा. राहुल देशमुख, वैभव वीरकर व प्रवीण काळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब कानडे गुरुजी, संतोष थोरात, साहिल कानडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण ननवरे, सूत्रसंचालन अमृता कानडे तर आभार सम्राट कानडे यांनी मानले.
--
फोटो ओळी : मंचर सानेगुरूजी कथामाला अभिवादन
फोटो ओळी : छायाचित्राखालील मजकूर : सानेगुरुजी कथामाला व ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानद्वारा कळंब (ता. आंबेगाव) येथे महात्मा फुले व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अभिवादन करताना मनीषा कानडे, वैभव वीरकर.