कुरुळी: पुणे -नाशिक महामार्गावरील मागील दोन ते तीन महिन्यांपासून कुरुळी ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना, वाहनचालकांना होत होता. याबाबत लोकमतने वृत्त दिले होते. याची दखल घेत कुरुळी ग्रामपंचायतीने चिंबळी फाटा येथील मोई चौक व इतर ठिकाणचा कचरा उचलत परिसर स्वच्छ केला. या ठिकाणी जंतुनाशक पावडरची फवारणी करण्यात आली.
कुरुळी ग्रामपंचायतमार्फत रस्त्यांवरील कचऱ्याची साफसफाई करून त्या ठिकाणी कारवाई संदर्भात सूचनांचे फलक लावले आहे. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे कुरूळीच्या ग्राम विकास अधिकारी कविता कोतवाल यांनी सांगितले.
फोटो आहे :
240921\20210924_155815.jpg
फोटो ओळ:चिंबळी फाटा येथील मोई चौक व इतर ठिकाणचा कचरा उचलण्यात आला