पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश केला आहे, नियमात बदल केला जाणार नाही. पण, एखाद्या आस्थपनेत जास्त रुग्ण सापडले. तर ती बंद करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात आठ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मार्च, एप्रिल, मे महिन्यात शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. दिनांक २२ मे पूर्वी शहरात २६५ रुग्ण होते त्यामुळे राज्य सरकारने २२ मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले होते. जुन, जुलै महिन्यात रूग्णाची संख्या वाढत आहे.आॅगस्टच्या पहिल्या दिवसापासून दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. रुग्णसंख्या २५ हजार ४९५ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा समावेश राज्य सरकारने शहराचा समावेश रेडझोनमध्ये केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आयुक्तांना शासन निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे शहर आता पुन्हा रेडझोन असणार आहेत.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे शहर रेडझोनमध्ये समाविष्ट झाले आहे. आपले शहर रेडझोनमध्ये असणे ही बाब चांगली नाही. आपले शहर हे औद्योगिकनगरी आहे. ज्या कंपनीत, दुकानामध्ये पॉझिटीव्ह रुग्ण सापडतात. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतो. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या सापडल्यास आस्थापना काही कालावधीसाठी बंद केल्या जातील. नियमांत फारशे बदल होणार नाहीत.’’
नागरिकांना दक्षतेचे आवाहनआयुक्त म्हणाले, ‘‘शहरातील काही कंपन्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडले होते. त्या कंपन्या तात्पुरत्या बंद केल्या होत्या. पण, ज्या आस्थापनांमध्ये एखादा रुग्ण सापडल्यास त्यांचे ट्रेसिंग करुन तपासणी करतो. रुग्णसंख्येनुसार कंपनी परिसर निर्जुंतीकरण पुन्हा चालू केली जाते. नागरिकांनी बाहेर पडताना सुरक्षित अंतराचे पालन करावे. कायम मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टंसिंगकडे आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.’’