पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेघरांसाठी घरकुल उभारण्यासाठी आरक्षित जागांवर गृहप्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ हजार ४१८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले. चऱ्होली, रावेत, डुडुळगाव येथील भूखंडावर गृहप्रकल्प उभारले जातील.महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या घरकुल उभारण्याची कामे सुरू आहेत. नियोजनानुसार ती पूर्ण झालेली नाहीत. पदाधिकाऱ्यांनी अनेक योजना जाहीर केल्या. मात्र, त्या पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. घरकुलातील साडेतेरा हजार लाभार्थ्यांपैकी निम्म्याच लाभार्थींना घरकुल दिले आहे. (प्रतिनिधी)- केंद्र सरकारचे अनुदान : दीड लाख - राज्य सरकारचे अनुदान : एक लाख - महापालिका हिस्सा : ७७ हजार ५०० रुपये- लाभार्थी हिस्सा : पाच लाख रुपये- एकूण किंमत : ८ लाख २७ हजार ५००
परिसरातील सदनिकांची संख्याचऱ्होली : १४४२ सदनिकारावेत : १०८१ सदनिकाडुडुळगाव : ८९६ सदनिका