चांदखेड : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीच्या सर्वपक्षीय प्रमुखांसह सभासदांच्या आशा अखेर मावळल्या. २१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र ऊस उत्पादक गट क्र. १ हिंजवडी-ताथवडे या मतदारसंघात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने येथे मतदान होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष विदुरा उर्फे नानासाहेब नवले यांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
कारखान्याच्या गट क्रमांक १ ताथवडे-हिंजवडी या गटातील तीन जागेसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर चार अर्ज शिल्लक राहिले होते. या गटातील चार उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे.
मतदारसंघाकरिता दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ५ या कालावधीत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर या तालुक्यातील ५७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. कारखान्याचे एकूण २२,२५८ मतदार आहेत. मतमोजणी दि. ६ एप्रिलला सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर मतदारसंघनिहाय उमेदवार खालील प्रमाणे
हिंजवडी- ताथवडे गट (३ जागा)
१) विदुराजी विठोबा नवले
२) चेतन हुशार भुजबळ
३) दत्तात्रय गोपाळ जाधव
४) बाळू दत्तात्रय भिंताडे
बिनविरोध निवड झालेले गट आणि संचालकांची नावे खालीलप्रमाणे
पौड - पिरंगुट गट (३ जागा)
१) धैर्यशील रमेशचंद्र ढमाले
२) यशवंत सत्तू गायकवाड
३) दत्तात्रय शंकरराव उभे
तळेगाव-वडगाव गट ( ३ जागा)
१) बापूसाहेब जयवंतराव भेगडे
२) ज्ञानेश्वर सावळेराम दाभाडे
३) संदीप ज्ञानेश्वर काशिद
सोमाटणे - पवनानगर गट
१) छबूराव रामचंद्र कडू
२) भरत मच्छिंद्र लिम्हण
३) उमेश बाळू उर्फ बाळासाहेब बोडके
खेड- शिरूर हवेली गट (४ जागा)
१) अनिल किसन लोंखडे
२) विलास रामचंद्र कातोरे
३) अतुल अरुण काळजे
४) धोंडीबा तुकाराम भोंडवे
महिला राखीव (२ जागा)
१) ज्योती केशव अरगडे
२ ) शोभा गोरक्षनाथ वाघोले
अनुसूचित जाती / जमाती- (१ जागा)
लक्ष्मण शंकर भालेराव
इतर मागासवर्ग-(१ जागा)
राजेंद्र महादेव कुदळे
विमुक्त जाती / भटक्या जमाती - (१ जागा)
शिवाजी हरिभाऊ कोळेकर
निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले पण.....
संत तुकाराम साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विक्रमी २२६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी छाननीमध्ये ५ अर्ज बाद झाले, तर २६ उमेदवारांनी दुबार अर्ज भरल्याने काढण्यात आले. छाननीनंतर १९५ उमेदवार रिंगणात राहिले होते. कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळीच्या उपस्थित सर्व उमेदवारांचा वाकड येथे मेळावा घेण्यात आला होता. यामध्ये कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा ऊर्फ नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले प्रत्यक्षात सर्व गट बिनविरोध झाले असताना नानासाहेब नवले यांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागत होते.