पिंपरी : जळगाव येथे झालेल्या अकरा वर्षांखालील राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहर मुलांच्या संघाने कोल्हापूर जिल्हा संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले, तर पिंपरी-चिंचवड शहर मुलींच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत मुलांचे १८ तर मुलींचे १२ संघ सहभागी झाले होते. पिंपरी-चिंचवड विरुद्ध कोल्हापूर जिल्हा यांच्यातील अंतिम लढतीत वरुण गायकवाडने २, तर पियुष क्षीरसागर, विनीत साळवी व अमोल मगदूम यांनी प्रत्येकी १ गोल करत ४-१ ने मात केली. पिंपरी-चिंचवड विरुद्ध पुणे मुलींच्या सामन्यात पल्लवी शेळके हिने १ गोल केला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार चंदुलाल पटेल व सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे, जळगाव जिल्हा रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास पटेल, सविच विशाल मोरे उपस्थित होते. स्टर्लिंगला उपविजेतेपदरुलर गेम फेडरेशन आॅफ इंडिया, फुलगाव येथे आयोजिण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल आणि कबड्डी स्पर्धेत भोसरी येथील स्टर्लिंग हायस्कूलने उपविजेतेपद पटकाविले. कबड्डी सामन्यांमध्ये प्रणव सैद, वेदान्त आवटे यांनी उत्कृ ष्ट चढायांत, तर ओम आल्हाट, सिद्धान्त देवकर यांनी उत्तम पकड केली. हायस्कूलच्या प्राचार्या शिबू राजू यांनी विजेत्यांचे आभिनंदन केले. विजेत्या संघास हायस्कूलचे क्रीडाशिक्षक सतीश गावंडे यांनी मार्गदर्शन केले. कन्याशाळा ३ चे यशमहापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या आंतशालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत पिंपरीनगर येथील हिंदी कन्याशाळेने निगडी शाळा २/२ ला पराभूत करीत विभागीयस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. स्थायी समितीचे सभापती हिरानंद आसवाणी यांनी विजेत्या संघाची भेट घेऊन त्यांना स्पोर्टस् शर्टस् व ट्राऊझर भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता गुप्ता उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवड संघास रोलबॉलचे विजेतेपद
By admin | Published: January 10, 2017 3:10 AM