येरवडा : केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जास्त गुण मिळूनही पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये स्वतंत्रपणे समावेश केला गेला नाही, त्यामुळे या शहरावर केंद्र सरकारने अन्यायच केला आहे, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केली. विश्रांतवाडी ते संगमवाडी रेनबो बीआरटी मार्गाचे पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. ३०) सकाळी उद्घाटन झाले. या वेळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्वतंत्रपणे समावेश करण्यासाठी माजी केंद्रीयकृषिमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल. पिंपरीला न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.’’या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, अरविंद शिंदे, नगरसेवक प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे भीमराव गलांडे व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. डेक्कन कॉलेज चौकात बीआरटी स्थानकाचे फीत कापून उद्घाटन झाले. त्यानंतर पवार यांनी स्थानकाची पाहणी करून उपस्थित लवाजम्यासह बीआरटी मार्गावरून विश्रांतवाडीची रपेटही केली.
पिंपरी-चिंचवडवर ‘स्मार्ट सिटी’त अन्याय
By admin | Published: August 31, 2015 4:12 AM