पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या प्रभावी उपाययोजना महापालिकेने केल्या असून शहरात आलेल्या १३९४ प्रवाशांना होम क्वारंटाईन केले आहे. डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी अशा १२० टीम त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे आठवडाभरात एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळेला नाही. कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर झालेले नसून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष तयार केला आहे. तसेच रूग्णांची संख्या वाढली तर पिंपरीतील जिजामाता रूग्णालयात शंभर बेड आणि नेत्ररूग्णालयातही बेडची व्यवस्था केली आहे. तसेच वैद्यकीय विभागाच्या वतीने डॉक्टर आणि परिचारिक अशी व्यवस्था सज्ज केली आहे. स्वाईन फ्लूच्या कालखंडात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कोरोनाचा सामना करीत आहेत.
परदेशातील नागरिकांवर नजरमहापालिकेच्या वतीने परदेशातून आलेल्या प्रवाशी आणि त्यांच्या कुटुंबावर लक्ष ठेवले आहे. त्यासाठी सुमारे १२४ टीम तयार केल्या आहेत. आलेले प्रवाशी त्यांची ट्रॅॅव्हल हिस्ट्री तपासून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. होम क्वारंटाईनमध्ये असणाºया नागरिकांवर प्रशासनाचे बारिक लक्ष आहे. सध्या १३९४ प्रवाशांना होम क्वारंटाईन केले आहे.
तपासणीत १७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह पुण्यातील एनआयव्हीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आजपर्यंत एकूण २०१ व्यक्तींचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी १८६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर बारापैकी तीन जणांवर उपचार करून सोडून देण्यात आल्याने रूग्णालयात सध्या नऊ जण उपचार घेत आहेत. काल दाखल केलेल्या १७ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पंधरा जणांचे अहवाल प्रतिक्षेतमहापालिकेच्या रूग्णालयात पंधरा जणांना दाखल केले असून त््यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीमध्ये तपासणी करण्यासाठी पाठविले आहेत. रूग्णालया सध्या चोवीस जण अ?ॅडमीट आहेत, मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच १४ दिवसांचा होम क्वारंटाईन पूर्ण करणाºयांची संख्या १९७ आहे. तसेच शनिवारी १७ जणांना डिस्चार्ज केले आहे. महापालिकेचे प्रशासन, वैद्यकीय आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन हे एकजूटीने काम करीत असल्याने आठवडाभरात एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ह्यह्यपिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व भोसरी येथील नवीन रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष तयार केला आहे. आणखी दोन रुग्णालयात आयसोलेशन कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लॉक डाऊनच्या कालखंडात नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वतची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. नियमितपणे हँडवॉश करावा. सोशल डिस्टसिंग पाळायला हवे. हस्तांदोलन टाळावे, सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत. नागरिकांनी आपल्या, कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.ह्णह्ण