उन्हाळी हंगामातील बाजरीचे पीक हे पशुधनास चारा आणि अन्नधान्य दोन्हीही मुबलक होत असल्याने बहुसंख्य शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक घेताना दिसतात. बाजरीच्या पिकास हवामान पोषक ठरू लागले आहे. त्यामुळे बाजरीचे पीक हिरवेगार होऊन जोमात येत आहे. उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळणार असल्यामुळे शेतकरीवर्ग सकाळी व दुपारी पिकाचे राखण करण्यास व्यस्त आहेत.
या भागात पाण्याची कमतरता व वरून रखरखीत उन्हाचा मारा त्यामुळे हिरव्या पिकांचा प्रश्नच येत नाही. सोबतच हिरवा चारा तर फारच कमी पाहायला मिळतो. अशा वेळी बाजरीचे पीक उपयोगी ठरते. एकंदरीत सध्या तरी कांदा पिकापेक्षा बाजरी बरी असे शेतकऱ्यांचे मत झाले आहे.
--
फोटो क्रमांक : १६आळेफाटा पीक जोमात
फोटो- पिंपरी पेंढार येथील राजकुमार गणपत कुटे यांच्या शेतातील जोमदार बाजरीचे पीक.