पहिल्यापासूनच गाव बिनविरोध व्हावे, यासाठी ग्रामस्थानी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे आठ जागांसाठी निवडणुका झाल्या. बिनविरोधमध्ये संतोष दुरगुडे, अमोल वंडेकर, संतोष कुटे, सुप्रिया दिनेश कुटे, संदीप रामदास वाघ, रूपाली विशाल कुटे, सुरेखा रोहिदास वेठेकर हे सात उमेदवार बिनविरोध आले, तर अटीतटीच्या लढाईत आणि सर्व गावाचे लक्ष लागलेल्या वार्ड क्र. पाचमधील शैलेश विठ्ठल जाधव, दीपाली महेश कुटे, दत्तात्रय मारुती चव्हाण यांनी बाजी मारली, वार्ड क्र. एकमध्ये सुवर्णा वेठेकर, शैला जाधव, वार्ड क्र. तीनमध्ये अनिता कुटे, वार्ड क्र. चारमध्ये बळशिराम काशीनाथ खिल्लारी, सविता अभिनंदन पोटे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.
निवडून आलेल्या उमेदवारांनी हनुमान मंदिरात येऊन दर्शन घेतले.