पिंपरी : पिंपरीचे पोलीस आयुक्त असलेले कृष्ण प्रकाश यांचा गुन्हेगारी जगतात चांगलाच दबदबा आहे. ते ज्या ठिकाणी कार्यरत असतात तिथे कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारांवर मोठा वचक असतो. त्यांनी त्याच्या आत्तापर्यँतच्या सेवेत कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता आपल्या धडाकेबाज कामाने दखल घेण्यास भाग पाडले आहे.
आयर्न मॅन किताब पटकविल्याबद्दल पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडनमध्ये समावेश करण्यात आला आहे. आयपीएस - आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरीमधील वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे सचिव अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्र यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ब्रिटीश संसदचे सदस्य वीरेंद्र शर्मा, आलोक शर्मा, वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकुल व वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स इंग्लंडचे भारतातील अध्यक्ष तथा दिल्ली उच्च न्यायालयातील वकील संतोष शुक्ला आदींनी कृष्ण प्रकाश यांना हा बहुमान मिळाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या