शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

शिखर कावडीने कडा सर!

By admin | Published: February 26, 2017 3:30 AM

पानवली (ता. दौंड) येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत शंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त भाविकभक्तांनी हरहर महादेवचा जयघोष करत पवित्र अशा भीमा नदीच्या पाण्याने भरून

पाटेठाण : पानवली (ता. दौंड) येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत शंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त भाविकभक्तांनी हरहर महादेवचा जयघोष करत पवित्र अशा भीमा नदीच्या पाण्याने भरून आणलेल्या शिखर कावडीने उंच कडा सर करत जल्लोषात भक्तिपूर्ण वातावरणात महादेवाला जलाभिषेक घालण्यात आला.दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त पानवली येथील ग्रामदैवत तसेच उंच डोंगरावर असलेल्या शंभो महादेवाची मोठ्या स्वरूपात यात्रा भरवली जाते. पहाटे शिवलिंगाला अभ्यंग स्नान, विधिवत पूजा, महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी बाराच्या दरम्यान वाजतगाजत आलेल्या कावडींनी भीमा नदीच्या पाण्याने महादेवाला धार घालण्यात आली. कावडींचा कार्यक्रम पाहण्यासाठी पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, टाकळी भीमा या परिसरातील भक्तांनी मोठी गर्दी केली होती. शेवटी शंभो महादेवाला धार घातल्यानंतर आरती होऊन यात्रेची सांगता झाली. या वेळी देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष कैलास गाढवे, बन्सीलाल फडतरे, भीमाजी मेमाणे, शहाजी कुलाळ, नानासाहेब ठोंबरे, सुरेश चव्हाण, किशोर गाढवे, अमोल कुलकर्णी, गोरख जगताप उपस्थित होते.