पुरंदरच्या पूर्व पट्टयातील पिसर्वे गावची चैत्री यात्रा रामनवमीच्या आदल्या दिवशी भरते. या भागातील यात्रा ख-या अर्थाने पिसर्वेच्या यात्रेने सुरू होतात. गुढीपाडव्याच्या आधी एक दिवस अखंड हरिनाम सप्ताहाने सुरू होणारा हा यात्रोत्सव हनुमान जयंतीच्या दिवशी संपन्न होतो. मात्र मागील वर्षांपासून यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने यात्रा रद्द केली जात आहे.
गतवर्षी यात्राकाळात रुग्ण नसताना देखील यात्रा रद्द केली होती. यावर्षी मात्र एप्रिल महिन्यातच रुग्ण संख्या १४ वर पोहचल्याने चैत्री यात्रेवरील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. पहाटे सरपंच बाळासाहेब कोलते यांच्या हस्ते सपत्नीक पूजा अभिषेक झाल्यानंतर गावातील सर्व मंदिरांना बंद केले जाणार आहे. बाहेरील पाहुणे बोलावल्यास त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी प्रकाश जाधव यांनी सांगितले आहे.
पिसर्वे येथील काळभैरवनाथांची आकर्षक सजावट.